Video Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांच्या हत्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद, अमानुषपणे करण्यात आली हत्या

तपास एनआयएकडं सोपविण्यात आला आहे. मात्र ही हत्या जेव्हा झाली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज आता टीव्ही9च्या हाती लागल्या आहेत. हे फुटेज पाहिल्यानंतर किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आली ते दिसते.

Video Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांच्या हत्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद, अमानुषपणे करण्यात आली हत्या
उमेश कोल्हे
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 2:37 PM

अमरावती : अमरावतीतील उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करतानाचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झालंय. रात्रीची वेळ असल्यानं ही व्हिडीओ पाहिजे तसा स्पष्ट दिसत नाही. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं हे दूरच दृश्य कॅप्चर केलंय. व्हिडीओत तीन-चार जण झटापत करताना दिसत आहेत. कुणा एकावर वार करतानानाचं हे चित्रीकरण आहे. एक जण खाली पडलेला आहे. दुसरे त्याला मारहाण (assault) करताना दिसत आहे. उमेश यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. त्यांच्या मानेवर तसेच पोटावर जखमा झाल्या होते. चाकूनं त्यांच्या शरिरावर जखमा झाल्याचं शवविच्छेदन अहवालात (autopsy report) स्पष्ट झालं. या व्हिडीओत मारहाण करताना दिसत आहे. पण, ते चेहरे कोणते आहेत, हे याठिकाणी स्पष्टपणे दिसत नाही. शिवाय उमेशलाच मारहाण करत आहेत की, नाही, हेही यातून स्पष्ट होताना दिसत नाही. पण, त्याचं घटनेचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं. सुत्रांकडून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन-तीन जण एकाला मारताना दिसतात.

पाहा व्हिडीओ

शवविच्छेदन अहवालात काय

कालच शवविच्छेदन अहवाल समोर आला. यात उमेश कोल्हे यांच्या शरीरावर खोल जखमा असल्याचं स्पष्ट झालं. पाच ते सात इंज खोल जखमा उमेश यांच्या शरीरावर असल्याचं समोर आलं. याचा अर्थ चाकूसारख्या धारदार शस्त्रानं उमेश यांच्या शरिरावर हल्ला करण्यात आला होता.

हल्ला करण्याचं कारण काय

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी व्हाट्सअप ग्रुपवर पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. तपास एनआयएकडं सोपविण्यात आला आहे. मात्र ही हत्या जेव्हा झाली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज आता टीव्ही9च्या हाती लागल्या आहेत. हे फुटेज पाहिल्यानंतर किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आली ते दिसते.

पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

उमेश कोल्हे यांची 21 जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. आता या प्रकरणाचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेकंड वर्ग करण्यात आला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.