Amravati Murder Case : तालिबानी प्रवृत्तीनं घेतला उमेश कोल्हेचा बळी, अतुल भातखळकर यांचे संतप्त ट्वीट

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दुचाकीवरून येताना दिसतात. दोन गाड्यांनी सहा जण आले होते. त्यांनी गळा चिरून ही हत्या केली. उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे यांनी पोलिसांना माहिती दिली. महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हे दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी हल्ला केला.

Amravati Murder Case : तालिबानी प्रवृत्तीनं घेतला उमेश कोल्हेचा बळी, अतुल भातखळकर यांचे संतप्त ट्वीट
तालिबानी प्रवृत्तीनं घेतला उमेश कोल्हेचा बळी
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 11:00 PM

अमरावती : अमरावतीच्या उमेश कोल्हे यांचा तालिबानी प्रवृत्तीनं बळी घेतला. राज्यात सत्तांतर झालं. त्यामुळं या हत्या प्रकरणाची निःपक्ष चौकशी झाली. अन्यथा ही हत्या म्हणजे गेल्या अडीच वर्षाच्या हिरव्या राजकारणाचे परिणाम असल्याची टीका अतुल भातखडकर यांनी त्यांच्या ट्वीटवरून केली आहे. उदयपूर हत्याकांडानं देश हादरलं. अमरावतीच्या उमेश कोल्हेच्या (Umesh Kolhe) हत्येसंदर्भात पोलिसांनी (Police) आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतलं. उमेश हे मेडिकल (Medical) व्यावसायिक. 21 जूनला त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट टाकल्यामुळं उमेश यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.

घरी जात असताना केला हल्ला

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दुचाकीवरून येताना दिसतात. दोन गाड्यांनी सहा जण आले होते. त्यांनी गळा चिरून ही हत्या केली. उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे यांनी पोलिसांना माहिती दिली. महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हे दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी हल्ला केला. माहिती मिळताच महेश घटनास्थळी गेले. तेव्हापर्यंत उमेश यांचा मृ्त्यू झाला होता. दोन-चार मेसेज फारवर्ड केल्यामुळं हत्या होईल, असं वाटत नसल्याचं महेश यांनी सांगितलं. उमेश यांना कुणाकडूनही धमक्या आल्या नाहीत, अशी माहिती महेश यांनी दिली.

इरफान खानला नागपुरातून अटक

1 जुलै रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणचे (एनआयए) पथक दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित धागेदोरे जुळविले. एनआयएच्या पथकात चार-पाच जणांचा समावेश होता. त्यांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. अमरावती हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला. इरफान खान असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आधी सहा जणांना अटक केली होती. आता सातवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं म्हणून उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. इरफान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवितो. त्यानेच उमेश यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. 21 जून रोजी उमेश यांची हत्या करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा शहरात दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला.

हे सुद्धा वाचा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.