प्रॉपर्टीचा वाद टोकाला गेला, पुतण्याने भररस्त्यातच काकांवर…

प्रॉपर्टीसाठी लोकांना नात्याचाही विसर पडतो. रक्ताची नातीच प्रॉपर्टीसाठी जीवावर उठतात. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून सख्खा पुतण्याच काकाच्या जीवावर उठल्याची घटना घडली.

प्रॉपर्टीचा वाद टोकाला गेला, पुतण्याने भररस्त्यातच काकांवर...
उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून पुतण्याचा काकांवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:12 PM

उल्हासनगर / निनाद करमरकर : प्रॉपर्टीच्या वादातून पुतण्याने भररस्त्यात दोन सख्या काकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात एका काकाचा मृत्यू झाला असून, दुसरे काका गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण बदलापूर रोडवर सकाळी 7 वाजता ही घटना घडली. घटनेत मनवीर मरोठिया यांचा मृत्यू झाला, तर रामपाल करोतीया हे जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

प्रॉपर्टीच्या वादातून घडली घटना

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन चौकात आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा आपल्या सख्या काकांशी प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, भररस्त्यात पुतण्याने आपल्या दोन्ही काकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एका काकांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा काका जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पुतण्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.