वर्धा : संपत्तीच्या वादातून काकानेच पुतण्याची जिनिंग फॅक्टरी जाळल्याचा (set into fire) धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबतच पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न काकाने केला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ही घटना घडलीय. या प्रकरणी आर्वी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काका दीपक देशमुख याला पोलिसांनी अटक केली.या घटनेत जिनिंगमधील 45 ते 50 लाखांचा कापूस जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर आर्वी नगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठत आग विझवली. (uncle set into fire the cotton ginning of his nephew wardha)
दाखल केलेल्या तक्रारीनुसार आर्वी येथील कौस्तुभ देशमुख यांच्या मालकीची एक जिनिंग आहे. ते त्यांच्या जिनिंमध्ये काम करत होते. यावेळी आरोपी दीपक देशमुख म्हणजेच कौस्तुभ देशमुख यांचे काका तलवार घेऊन आले. यावेळी त्यांनी कौस्तुभला धमकावलं. तसेच, त्यांनी पेट्रोल टाकून जिनिंगमध्ये आग लावली. आग वाढल्यामुळे कोस्तुभ आपला जीव वाचवत पोलीस ठाण्यात गेले. तिथे गेल्यांनतर त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रसांगाची माहिती दिली.
कौस्तुभ देशमुख यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. पोलिसांनी कौस्तुभचे काका म्हणजेच आरोपी दीपक देशमुख आणि त्यांच्या वाहन चालकाला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. तक्रार दाखल केल्यानुसार दीपक देशमुख यांनी लावलेल्या आगीत तब्बल 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, पालघर नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोरेकुरण ग्रामपंचायत हद्दीत नगरपरिषदेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. याच ठिकाणी ही आग लागली आहे. पहाटे साडे तीन वाजता ही आग लागली होती. आगीने रौद्ररुप धारण केले असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.
Breaking – A metropolitan magistrate, in Andheri, has issued a bailable warrant against actor Kangana Ranaut in a criminal defamation complaint by lyricist Javed Akhtar. @teamkangana#JavedAkhtar
— Live Law (@LiveLawIndia) March 1, 2021
इतर बातम्या :
नालासोपाऱ्यात पहाटे कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून, लुटीचा संशय
(uncle set into fire the cotton ginning of his nephew wardha)