डिलिव्हरीसाठी नवऱ्यासोबत माहेरी निघाली, वाटेत डंपरची धडक, पोट फुटून 8 महिन्याचं बाळ गर्भाबाहेर फेकलं गेलं

रामू नावाचा इसम आपल्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी सोडायला चालला होता.

डिलिव्हरीसाठी नवऱ्यासोबत माहेरी निघाली, वाटेत डंपरची धडक, पोट फुटून 8 महिन्याचं बाळ गर्भाबाहेर फेकलं गेलं
हृदयद्रावक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 11:12 AM

गर्भवती महिलेला रस्त्यावर एका डंपरने (Dumber Accident) चिरडलं. या भीषण दुर्घटनेत (Accident News) गर्भवती महिलेचं पोट फुटलं आणि अर्भक रस्त्यावरच बाहेर आलं. धडक इतकी भीषण होती की या गर्भवती महिलेचा जागीच जीव गेला. पण दैव बलवत्तर म्हणून अर्भकाचा जीव वाचलाय. या नवजात बाळाला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली सध्या हे बाळ असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. तर डंपर चालक फरार झाला असून याप्रकरणी पोलीस तक्रारही (UP Road Accident) दाखल करण्यात आलेली आहे. सध्या या अपघाताला जबाबदार असलेल्या फरार डंपर चालकाचा शोध सुरु आहे. या घटनेत बाळ बचावलं असलं तरी त्यानं आपल्या आईला गमावलंय. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. अंगावर काटा आणणारा हा अपघात उत्तर प्रदेशात घडलाय.

काळीज पिळवटून टाकणारी घटना

उत्तर प्रदेशच्या फिरोजपूरमध्ये हा काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. एक गर्भवती महिला बाईकवरुन आपल्या पतीसोबत जात होता. त्यावेळी एका भरधाव डंपरने धडक दिली. यात गर्भवती महिलेला जबर मार बसला. गर्भवतील महिला जागच्या जागी ठार झाली, तर तिच्या गर्भातून रस्त्यावर बाळानं जन्म घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. ही धडक इतकी भीषण होती की, गर्भवतीचं पोट फुटलं आणि तिच्या गर्भातील बाळ दूर फेकलं होतं.

अंगावर काटा आणणारी घटना

आगरा येथील धनौली गावांत हा भीषण अपघात झाला. रामू नावाचा इसम आपल्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी सोडायला चालला होता. रामू आणि त्याची पत्नी कामिनी नव्या बाळाच्या आगमनासाठी तयारीला लागले होते. डिलीव्हरीचे दिवसही जवळ येत होते. पण कामिनीला तिच्या आईच्या घरी सोडण्यासाठी रामू निघाला होता. पण वाटेतच काळानं घाला घातला. रामूची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती. तिचं माहेर कोटला इथं होतं. रामू दुचाकीवरुन बायकोला घेऊन निघाला होता. त्यावेळी त्याच्या बाईकला टक्कर दुसऱ्या एका दुचाकीशी झाली. त्यानंतर धकड बसलेला बाईक रस्त्याच्या कडेला उलटली. तर रामू आणि त्याची पत्नी ज्या बाईकवर स्वार झाले होते, त्या बाईकला भरधाव डंपरने धडकलं. या धडकेत रामू यांच्या पत्नीला जबर मार बसून तिच्या गर्भातील बाळ बाहेर आलेआणि नाजूक बाळही दूरवर फेकलं गेलं.

हे सुद्धा वाचा

आई ठार, बाळ सुखरुप

ही घटना कळल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. अंगावर काटा आणणार असाच हा अपघात होता. या अपघाताची माहिती कळल्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आलं. दरम्यान, नवजात बाळाला तातडीनं मेडिकल कॉलेजात भरती करण्यात आलं. एक वर्ष आधीच या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. या अपघातात कामिनीचा मृत्यू झाला. रामूनला किरकोळ जखम झाली आहे. तर त्यांच्या नवजात बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय. डॉक्टर या बाळावर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून या दुर्दैवी अपघातानं हळहळ व्यक्त केली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.