Police | बायको-मुलाचं मोठेपणा मिरवणं, पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलच अंगाशी आलं, एक क्लिक आणि मग….

Police | सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झालेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ काय कारवाई झाली आहे? बायको-मुलांमुळे हा पोलीस अधिकारी चांगलाच अडचणीत सापडलाय.

Police | बायको-मुलाचं मोठेपणा मिरवणं, पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलच अंगाशी आलं, एक क्लिक आणि मग....
police officer family
Image Credit source: social media
| Updated on: Jun 30, 2023 | 10:17 AM

लखनऊ : नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी व्हायरल झाल्याने एक पोलीस अधिकारी अडचणीत सापडला आहे. या पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली आहे. त्याच्यामागे चौकशीचा सेसमिरा लागलाय. या पोलीस अधिकाऱ्याची बायको आणि मुलाने 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत सेल्फी काढले. मोठेपणा दाखवण्यासाठी काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल माीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन्ही मुलं बेडवर बसलेली आहेत. तिथे 500 रुपयांच्या नोटांची बंडलं मांडलेली आहेत. ही एकूण रक्कम 14 लाखाच्या घरात आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

स्वत:चा बचाव करताना या पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितलं?

हा फोटो बाहेर येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. संबंधित पोलीस अधिकारी उत्तर प्रदेश उन्नावचा आहे. रमेश चंद्र साहानी असं पोलीस अधिकाऱ्याच नाव असून त्याची पोलीस लाइनमध्ये बदली करण्यात आली आहे. फोटो बाहेर आल्यानंतर रमेश चंद्र साहानी यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, “हे फोटो 14 नोव्हेंबर 2021 चे आहेत, जेव्हा मी माझी फॅमिली प्रॉपर्टी विकली होती”

वरिष्ठ पोलीस अधिकारी काय म्हणाला?

“स्टेशन हाऊस ऑफिसरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलं नोटांच्या बंडलसोबत दिसतायत. आम्ही या फोटोची दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्याची बदली केलीय आणि चौकशी सुरु केली आहे” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.