आयहाय… रोग बिग काय नाय! डॉक्टर तरुणीवर जीव आला म्हणून बघा त्याने काय केलं?
15 दिवस रोज यायचा, दर दुसऱ्या दिवशी तो आजारी कसा काय पडतो? म्हणून तिलाही शंका आली!
उत्तर प्रदेश : एकतर्फी प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण असाच एक अजब किस्सा कानपूरमध्ये (Kanpur Crime News) उघडकीस आलाय. एक रुग्ण चक्क डॉक्टर तरुणीच्या प्रेमात (One sided Love) पडला. एकदा डॉक्टर तरुणीला भेटल्यानंतर रोज तिला भेटण्याची इच्छा या तरुण रुग्णाला होत होती. त्यामुळे रोज केस पेपर बनवून हा तरुण या डॉक्टर तरुणीकडे उपचार घेण्यासाठी येऊ लागला. ज्युनिअर डॉक्टर (Junior Doctor) म्हणून कामावर असलेली तरुणी रुग्णसेवा करत होती. पण आदल्या दिवशी उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच हा तरुण रुग्ण पुन्हा का येतोय, यावरुन तिला शंका आली आणि अखेर या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड झाला.
डॉक्टर तरुणी जिथं ड्युटी करत होती, तिथल्या वरिष्ठांना तिने हा प्रकार निदर्शनास आणून दिला. आशिक बनलेला हा तरुण जेव्हा रुग्ण बनून रोज 15 दिवस केस पेपर घेऊन रोज येतोय हे लक्षात आलं, तेव्हा या तरुणाची तक्रारी केली गेली.
अखेर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला पकडलं आणि त्याला योग्य ते ‘औषधं’ही दिलं. सगळ्यात शेवटी या तरुण रुग्णाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पकडला गेल्यानंतर तरुण रुग्णानं मी तर औषधं आणायला गेलो होतो, आता पुन्हा जाणार नाही, असा युक्तिवाद केला.
हा तरुण मूळचा कानपूरच्या जाजमऊ भागातील असल्याची माहिती समोर आलीय. हा तरुण बरं वाटत नाही म्हणून मेडिकल कॉलेजच्या ओपीडीमध्ये गेला होता. तिथे असलेल्या ज्युनिअर डॉक्टरने इतर रुग्णांप्रमाणे या तरुणावरही उपचार केले.
पण डॉक्टर तरुणीला भेटल्यानंतर तरुण तिच्या प्रेमातच पडला. डॉक्टर तरुणीने लिहून दिलेल्या औषधांनी आता त्याला कसलं बरं वाटणार होतं? हा तरुण थेट दुसऱ्या दिवशी पुन्हा केस पेपर काढून ओपीडीमध्ये आला.
जेव्हा ड्युटीवर दुसरीच कुणीतरी डॉक्टर आहे, हे त्याला कळलं, तेव्हा त्यांना ती डॉक्टर तरुणी कुठेय, अशी चौकशी सुरु केली. या संपूर्ण प्रकाराची मेडिकल कॉलेजात तुफान चर्चा झाली. वरिष्ठांना तक्रार करण्यात आली.
शनिवारी तौहिद नावाचा हा तरुण रुग्ण पुन्हा ओपीडीत आला. पण तो येण्याआधीच सगळा स्टाफ त्याच्या ‘स्वागतासाठी’ जणू सज्जच होता. तौहिदने जसं ज्युनिअर डॉक्टरबाबत विचारलं, तसं त्याला स्टाफने पकडलं आणि त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
आता स्वरुप नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. आता त्याची रवानगी कोठडीत करण्यात आलीय. याप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.