दहा लग्न करणाऱ्या कोट्यधीशाची संपत्तीच्या वादातून हत्या
जगनलाल यादव यांची हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (UP Man killed for property dispute)
लखनौ : दहा लग्न करणाऱ्या उत्तर प्रदेशातील कोट्यधीश व्यक्तीची संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 52 वर्षीय जगनलाल यादव दहा वेळा बोहल्यावर चढले होते. संपत्तीच्या वादातून मफलरने गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (UP Man who married ten times killed over family property dispute)
संपत्ती दत्तकपुत्राच्या नावे करण्याच्या तयारीत
शेतकरी जगनलाल यादव यांच्याकडे काही कोटी रुपयांची वडिलोपार्जित संपत्ती होती. ही संपत्ती ते आपल्या दत्तकपुत्राच्या नावे करणार होते. मात्र त्याआधी ते शेतामध्ये मृतावस्थेत आढळले. यादव यांची त्यांच्याच मफलरने गळा दाबून हत्या करण्यात आली.
मफलरने गळा दाबून यादव यांची हत्या
जगनलाल यादव यांच्या मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जगनलाल यांची गळा दाबून हत्या केल्याची पुष्टी मिळाली आहे. त्यांच्या डोक्यावर जखम होती. म्हणजेच त्यांच्यावर एखाद्या वस्तूने वारही करण्यात आला असावा, अशी माहिती भोजीपुराचे एसएचओ मनोज कुमार त्यागी यांनी दिली.
पाच बायकांचा आजारपणातून मृत्यू
नव्वदच्या दशकात जगनलाल यादव यांनी पहिल्यांदा लग्न केलं होतं. त्यांच्या पाच बायकांचा आजारपणातून मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तर त्याच्या तीन पत्नी त्याला सोडून वेगळ्या राहायला लागल्या. सध्या ते पश्चिम बंगालच्या 35 आणि 40 वर्षीय दोन बायकांच्या सोबत राहत होते. (UP Man who married ten times killed over family property dispute)
दहा लग्नांनंतरही अपत्यसुख नाही
जगनलाल यादव यांची हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यादव यांचं घर मुख्य रस्त्यापासून जवळ आहे. त्यांच्या घराला चांगली किंमत आहे. त्यांनी अनेक वेळा लग्न करुनही, त्यांना अपत्यसुख लाभलं नाही. जगनलाल यांच्यासोबत एक युवक राहत होता, तो त्याच्या एका पत्नीच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
कौटुंबिक वादाची किनार
जगनलाल यादव यांच्या वडिलांनी अनेक वेळा लग्न केल्यानंतर आपल्या संपत्तीतून बेदखल केले होते. त्यांच्या संपूर्ण जमिनीची (70 बीघा) मालकी जगनलाल यांच्या मोठ्या भावाला देण्यात आली होती. 1999 मध्ये कौटुंबिक वादातून पंचायतीच्या आदेशानुसार 14 बीघा जमीन जगनलाल यांना परत देण्यात आली होती. त्यामुळे यादवांचे नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर आहेत.
संबंधित बातम्या :
हातातला घट्ट मोबाईल उलगडणार खूनाचं रहस्य? इचलकरंजीची घटना पोलिसांसाठी आव्हान
लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ
(UP Man who married ten times killed over family property dispute)