अखेर आरोपींना जन्मठेप… अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांडाचा निकाल लागला…
मालेगाव जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०११ मध्ये झालेल्या जळीतकांडाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला आहे.
नाशिक : २०११ मध्ये संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या घटनेचा अखेर निकाल आज लागलाय. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे ( YASHWANT SONAVANE ) यांचे जळीतकांड झाले होते. त्यावर आज नाशिक जिल्हयातील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय मालेगाव ( MALEGAON ) येथे सुनावणी होती. त्यादरम्यान मुख्य आरोपी पोपट शिंदेसह ( POPAT SHINDE ) तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण १५ आरोपींचा समावेश होता. उर्वरित काही आरोपींवर मोक्काच्या कारवाईची मागणी पोलिसांनी केलेली होती.
मालेगाव जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०११ मध्ये झालेल्या घटनेचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला आहे.
२५ जानेवारी २०११ रोजी इंधन माफियांनी छापा मारण्यासाठी गेलेले अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून ठार मारले होते. यामध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती.
मुख्य आरोपी पोपट शिंदे ही देखील या प्रकरणात जळाले गेले होते त्यांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. याशिवाय मच्छिंद्र सुवडकर, राजू शिरसाठ आणि अजय सोनवणे हे आरोपी होते. याच तिघांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मनमाड जवळ पानेवाडी येथे अनेक इंधन कंपन्या आहेत. त्याचाच फायदा घेऊन अनेक इंधन माफियांचा परिसरात वावर असतो. पानेवाडी गावाजवळ अनेकांनी त्यावेळी हॉटेल सुरू करून त्याआडून इंधनचा काळाबाजार केला जात होता.
इंधन माफियांची कुणकुण अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना लागल्याने त्यांनी शिंदे यांच्या हॉटेलवर धाड टाकली होती. याचवेळी आरोपींनी सोनवणे यांच्यावर इंधन टाकून जळाले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेला आज जवळपास ११ वर्षे उलटून गेलेले असतांना आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे अधिकारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.