मुलीच्या आवाजात करायचा फ्लर्ट, अनेकांसोबत केले नको ते कृत्य; उघडकीस आल्यावर पोलीसही चक्रावले!
एक तरुण मुलगी असल्याचे भासवून मुलांशी बोलून पैसे उकळायचा. पर्दाफाश होईल या भीतीने त्याने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले. नेमकं काय झालं वाचा...

राज्यातील रीवा जिल्ह्यात एक तरुण मुलगी असल्याचे भासवून मुलांशी फ्लर्ट करायचा. प्रेमाचे आमिष दाखवून पैसे उकळायचा. हा तरुण आवाज बदलण्यात इतका पटाईत होता की लोकांचा त्याच्यावर सहज विश्वास बसत असते. त्यामुळे तो अगदी सहज लोकांना फसवू लागला होता. तो गावातील मुलींचे फोटो डीपीला ठेवायचा आणि सोशल मीडियावर शेअर करायचा. आपला पर्दाफाश होईल या भीतीने त्याने स्वत:च्या अपहरणाचा कट रचला. ते पाहून कुटुंबीय आणि पोलीस चकीत झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याला केली असून चौकशी सुरु आहे.
हे प्रकरण रेवा जिल्ह्यातील मंगनवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणिकवार चौकीचे आहे. अलीकडेच 9 मार्च रोजी अमिलिया गावातील 20 वर्षीय विपिन रजक अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. विपिनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आणि माहिती देणारेही तैनात केले. शेकडो लोकांची चौकशी केली, पण कोणताही सुगावा लागला नाही. अखेर हा धूर्त तरुण त्याच्याच घराजवळील उध्वस्त घरात लपलेला सापडला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला.
मुलीच्या आवाजात करायचा फ्लर्ट
हा तरुण मुलींचा आवाज काढून मुलांशी फ्लर्ट करायचा. तसेच संधी साधून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्याने विपिन रावत नावाच्या तरुणाला मुलींचे फोटो डीपीला ठेवून त्याच्या जाळ्यात अडकवले होते. विपिनला विश्वासात घेऊन लाखो रुपये ट्रान्स्फर करून घेतले. मात्र, तो कधीही समोर आला नाही.
सत्य समोर येताच झाला गायब
9 मार्च रोजी विपिन रावत हा त्याच्या तथाकथित मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता, त्यामुळे या फसव्या तरुणाचा पर्दाफाश झाला. आपले सत्य उघड होईल या भीतीने तो तेथून पळून गेला आणि एका घरात जाऊन लपला. यानंतर त्याने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला आणि कुटुंबीयांना फोन करून बेपत्ता झाल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यामुळे तपास सुरू झाला.
एसपी विवेक लाल यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपी तरुणाचा मोबाईल तपासणीसाठी घेतला आणि त्याचे सोशल मीडिया अकाउंट तपासले. यावरून त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. त्याआधारे पोलिसांनी विपिन रजक याला पडक्या घरातून अटक केली. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.