जेवणानंतर दोघे भाऊ आपापल्या पत्नीसह रूममध्ये गेले, सकाळी उठून बघतात तर काय.. तिथे नेमकं काय झालं ?

नवं लग्न झालेल्या दोन भावांसोबत असं काही घडलं, ज्याची त्यांनी काय , संपूर्ण कुटुंबातील कोणीच कल्पना केली नव्हती. घरात आनंदाचं वातावरण होतं, दोन्ही मुलं नव्या सुनाना घेऊन घरी आले होते. पण त्यानंतर जे झालं, त्याने घरातील हसत-खेळतं वातावरण क्षणार्धात बदललं. त्यांच्यासोबत नेमकं काय झालं ?

जेवणानंतर दोघे भाऊ आपापल्या पत्नीसह रूममध्ये गेले, सकाळी उठून बघतात तर काय.. तिथे नेमकं काय झालं ?
शुभ विवाह
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 3:10 PM

लखनऊ | 25 नोव्हेंबर 2023 : नवं लग्न झालेल्या दोन भावांसोबत असं काही घडलं, ज्याची त्यांनी काय , संपूर्ण कुटुंबातील कोणीच कल्पना केली नव्हती. घरात आनंदाचं वातावरण होतं, दोन्ही मुलं नव्या सुनाना घेऊन घरी आले होते. पण त्यानंतर जे झालं, त्याने घरातील हसत-खेळतं वातावरण क्षणार्धात बदललं. त्यांच्यासोबत नेमकं काय झालं ?

उत्तर प्रदेशच्या हरदोई येथील ही घटना आहे. दोन्ही मुलांचे आणि नव्या सुनांचे जंगी स्वागत झालं. रात्री सगळेजण निवांत जेवले, त्यानंतर दोन्ही भाऊ पत्नींना घेऊन आपापल्या रूमममध्ये गेले. रात्रभरे दोघेही बायकोशी निवांत गप्पाही मारत होते. पण त्यानंतर काय झालं, हे कोणालाच कळलं नाही. सकाळी डोळे उघडल्यावर त्यांना जे दिसलं ते पाहून एकच गोंधळ माजला. घरातले सगळे एकत्र जमा झाले. त्यांच्या रुमचा नजारा काही वेगळाच होता. दोन्ही नव्या सुना या त्यांच्या रूममध्ये काय, घरातही नव्हत्या. त्या दोघीही गायब तर झाल्याच पण घरातील सगळ्या मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे घेऊनच त्यांनी पोबारा केला. हे बघून घरातले सगळेच चक्रावले. त्यांनी तातडीन पोलिसांकडे धाव घेतली आणि सगळा प्रकार सांगत तक्रार दाखल केली.

80 हजार रुपयात विकत घेतली वधू

हे संपूर्ण प्रकरण टडियावा गावातील आहे. तेथे राहणारे शिवकान्या यांची दोन्ही मुलं प्रदीप आणि कुलदीप अविवाहीत होते. दोघे दिल्लीत एका कंपनीत काम करायचे. काही दिवसांपूर्वी त्यांचा सीतापूरच्या राजकुमार आणि रवी यांच्याशी संपर्क झाला. त्यांना मुलांच्या लग्नाबाबत सांगितल्यानंतर त्यांनी मुलांना सीतापूर रोडवरील बस स्टेशनवर बोलावलं. जिथे त्यांची दोन तरूणींशी ओळख करून दिली आणि 80 हजार रुपये घेऊन त्यांना सोपवलं.

बुधवारी ते सर्वजण दोन्ही मुलींना घेऊन गावी आले आणि गावातील मंदिरात थाटामाटात लग्नं लावलं. लग्नानंतर रवी आणि राजकुमार परत गेले आणि बाकीचे सगळे नव्या सुनांना घेऊन घरात आले.

खोलीत झोपायला गेले आणि

रात्री सगळेजण हसतखेलत जवेल, निवांत गप्पा मारल्या. त्यानंतर प्रदीप आणि कुलदीप त्यांच्या बायकोसोबत आपापल्या खोलीत गेले. पण त्या वधूंचा डाव वेगळाच होता. रात्री सर्वजण झोपल्यावर कुलदीपच्या बायकोने त्याच्या खिशातून मेन गेटची चावी चोरली. आणि घरातील सर्व मौल्यवान वस्तू, दागिने तसेच दोन्ही भावांच्या खिशातील हजारो रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन त्या दोघींनी पळ काढला. सकाळी उठल्यावर बघतात तर काय नव्या सुना तर गायबच झाल्या, पण सामानही लुटून नेलं. सासरच्या लोकांनी तातडीने राजकुमार आणि रवीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कॉलही लागला नाही. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून आणि लुटून त्या दोघीही पळून गेल्या.

याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही लुटारू तरूणींचा शोध घेण्यात येत आहे. त्यांनी अन्नात गुंगीचं औषध मिसळून सर्वांना बेशुद्ध केलं असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.