Crime : दीराने गोड बोलून वहिनीला दिली कोल्ड्रिंक पण त्यानंतर झाला मोठा घात, धक्कादायक घटना समोर!
भावासारख्या दिराने जर त्याच्या वहिनीचा विश्वासघात केलाय. आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime : प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचा दीर हा भावासारखा असतो. पण याच भावासारख्या दिराने जर त्याच्या वहिनीचा विश्वासघात केला तर? आता एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. त्यावेळी दिरानं तिच्यासोबत असं काही केलं आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
या महिलेचा तिच्या पतीविरूद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे ही महिला 26 मे रोजी कोर्टात तारखेसाठी आली होती. त्यावेळी तिच्या दिराने काही खोटं कारण देत गोड बोलून तिला गाडीत बसवलं आणि सोबत घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपलं खरं रूप दाखवलं, पीडित महिलेने स्वप्नाताही विचार केला नव्हता की तिच्या पतीचा भाऊ इतक्या खालच्या थराला जाईल.
26 मे रोजी दुपारी 1.30 वाजता ती महिला तारखेला हजर राहिली होती. त्यानंतर घरी जात असताना आरोपी दिराने तिला गोड बोलत कारमध्ये बसवत तिला कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकत तिला प्यायला दिलं. नराधमाने आपल्या पाच साथीदारांसह तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर महिलेनं तिचा दिर आणि पाच जणांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की, दिराने फसवणूक करत आपल्या साथीदारांसह रेप केला आणि दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तिला बसस्थानकात सोडून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एटा शहरातील आहे.