भाच्यासोबतच अफेअर; नवऱ्याने रंगे हाथ पकडलं, महिलेचा पतीला कॉफी देऊन मारण्याचा भयानक कट
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका महिलेने तिच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नवऱ्याने जेव्हा तिला रंगेहाथ पकडलं तेव्हा तिने नवऱ्याला मारण्यासाठी असा भयानक प्लान रचला कि ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.

मेरठच्या सौरभ राजपूत प्रकरणानंतर, अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली जसं की पत्नीने पतीला मारलं आहे किंवा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आता उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. एका पत्नीने तिच्या पतीला चक्क विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या घरच्यांनी सुनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पिंकी मोबाईलवर दुसऱ्या मुलाशी तासंतास बोलत बसायची
हे प्रकरण खतौली कोतवाली परिसरातील भायंगी गावाचं आहे. 26 वर्षीय अनुज शर्माचा विवाह दोन वर्षांपूर्वी गाजियाबादच्या लोणी पोलीस स्टेशन परिसरातील फरखनगर येथील रहिवासी पिंकी शर्मा उर्फ सना हिच्याशी झाला होता. अनुज मेरठच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये काम करतो. लग्नानंतर काही महिन्यांतच अनुज आणि पिंकीमध्ये वाद सुरू झाले. असा आरोप आहे की पिंकी मोबाईलवर दुसऱ्या मुलाशी बोलत असे, त्यामुळे अनुज आणि पिंकीमध्ये वारंवार भांडणे होत असत.
भाच्यासोबतच अफेअर
अनुजची मोठी बहीण मीनाक्षीचा आरोप आहे की पिंकीचे लग्नापूर्वी दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही ती त्याच्याशी मोबाईलवर बोलत असे. अनुजने पिंकीला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यात सुधारणा झाली नाही. जेव्हा जेव्हा तो कामावर जायचा तेव्हा पिंकी त्या मुलाशी तासनतास बोलत राहायची. एके दिवशी अनुजने पिंकीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्या मुलासोबतचे संभाषण आणि फोटो पाहिले. मिळालेल्या माहितीनुसार, तो मुलगा पिंकीच्या काकाच्या मुलीचा मुलगा होता, जो नात्याने पिंकीचा भाचा लागत होता.
अनुजला दिली विष मिसळलेली कॉफी
अनुजची बहीण मीनाक्षीने आरोप केला आहे की, 25 तारखेच्या संध्याकाळी पिंकीने अनुजला कॉफीमध्ये विष मिसळून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मारण्याच्या उद्देशाने ती कॉफी त्याला प्यायला लावली. कॉफी प्यायल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनुजची बहीणीने हे देखील सांगितले की पिंकीने अनुजला संपवण्याचा कट रचला होता. अनुजची मोठी बहीण मीनाक्षी हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.