सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला

उत्तर प्रदेशातील पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनपूर येथून बेपत्ता झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचे गूढ अखेर पोलिसांनी उलगडले. सीडीआरच्या मदतीने पोलिसांनी तिच्या माहेरच्या गावात राहणाऱ्या तरुणाची आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले

सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला
सीआरपीएफ जवानाच्या बायकोची हत्या
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 12:14 PM

लखनौ : सीआरपीएफ जवानाच्या बेपत्ता (CRPF Jawan) पत्नीचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं. विवाहितेची हत्या करुन तिचा मृतदेह कानपूरमधील नाल्यात फेकून देण्यात आल्याचं समोर आलं आहे. अनैतिक संबंधातून (Extra Marital Affair) महिलेची हत्या झाल्याचं पोलीस तपासानंतर उघडकीस आलं आहे. भेटण्यास वारंवार नकार देत असल्याच्या रागातून तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Murder News) हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. सीआरपीएफ जवानाच्या बायकोचा मेकॅनिकवर जीव जडला होता, मात्र प्रियकरानेच अखेर तिचा जीव घेतला.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनपूर येथून बेपत्ता झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचे गूढ अखेर पोलिसांनी उलगडले. सीडीआरच्या मदतीने पोलिसांनी तिच्या माहेरच्या गावात राहणाऱ्या तरुणाची आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. महिलेची हत्या केल्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह कानपूरच्या ग्रामीण भागातील शिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाल्यात फेकल्याची माहिती दिली. आरोपींनी सांगितलेल्या घटनास्थळावरुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

जवान कर्तव्यावर, बायको बेपत्ता

रतनपूर कॉलनीत राहणारा इंद्रपाल सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. 20 फेब्रुवारी रोजी तो जमालपूर, मैनपुरी येथे निवडणूक कर्तव्यावर होता. या काळात त्याने आपली 34 वर्षीय पत्नी गीता हिला अनेकदा फोन केला, तेव्हा मुलगा सुशांत म्हणाला की, पुष्पेंद्र काका आले होते. त्यानंतर मी झोपलो. मला जाग आली तेव्हा आई घरी नव्हती. त्यावर इंद्रपालने पनकी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

घरात बिअरच्या कॅनसह अश्लील वस्तू

घटनास्थळी पोहोचलेल्या पनकी पोलिसांना घरात बिअरचे रिकामी कॅन आणि दोन ग्लासांसह काही अश्लील वस्तू आढळून आल्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पनकी पोलिसांनी कानपूर ग्रामीण भागातील रुरा हसनापूर गावचा रहिवासी मुख्तार आणि गंगागंजचा प्रॉपर्टी डीलर पुष्पेंद्र यांना सीडीआरद्वारे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

मेकॅनिकसोबत प्रेमसंबंध

चौकशीत कार मेकॅनिक मुख्तारचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी त्यालाही उचलले. मुख्तारच्या चौकशीत त्याचे गीतासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. ती भेटायला टाळाटाळ करत होती. 20 फेब्रुवारी रोजी तो त्याच्या दोन साथीदारांसह गीता यांच्या घरी तिला भेटण्यासाठी पोहोचला, तेथून तो गीताला फिरण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला होता. वाटेत त्याचा गीतासोबत वाद झाला. त्यामुळे त्याने गीताचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरुन मृतदेह ताब्यात घेतला.

संबंधित बातम्या :

मुलगा कुलूप उघडून घरात, आई मृतावस्थेत, जळगावातील हत्येचं गूढ काही तासात उलगडलं

बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल

पाचव्या मजल्यावरुन लिफ्टच्या खड्ड्यात पडला, नाशकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.