Ghaziabad Murder | अनैतिक संबंधांची कुणकुण, नवऱ्याने बायकोच्याच मदतीने प्रियकराचा काटा काढला

प्रिन्स नावाचा 23 वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची तक्रार गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्यात 19 डिसेंबर 2021 रोजी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सुमन नावाच्या महिलेवर पोलिसांना संशय आला.

Ghaziabad Murder | अनैतिक संबंधांची कुणकुण, नवऱ्याने बायकोच्याच मदतीने प्रियकराचा काटा काढला
गाझियाबादमधील तरुणाची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 9:32 AM

गाझियाबाद : पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad Crime) टीला मोड पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. पत्नीच्या अनैतिक संबंधांविषयी (Extra Marital Affair) समजल्यानंतर पतीने टोकाचं पाऊल उचललं. या कटामध्ये पत्नी आणि पतीचे इतर काही मित्रही सहभागी होते. हत्येनंतर आरोपीने तरुणाचा मृतदेह साहिबाबाद इंडस्ट्रिअल एरियामधील नाल्यात फेकला. पोलिसांनी अखेर या हत्या प्रकरणाचे गूढ उकललं. पती, पत्नी यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रिन्स नावाचा 23 वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची तक्रार गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्यात 19 डिसेंबर 2021 रोजी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सुमन नावाच्या महिलेवर पोलिसांना संशय आला.

…आणि सुमनने गुपित उघडलं

सुमनला ताब्यात घेत पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली. तेव्हा सुमनने आपला यात सहभाग असल्याचा इन्कार केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच तिने तोंड उघडलं. सुमनच्या कबुलीनुसार पोलिसांनी तिचा पती सुरेंद्र, त्याचे साथीदार नीरज, राहुल आणि विकास यांना अटक केली.

नेमकं काय घडलं?

सुरेंद्रला सुमनच्या अनैतिक संबंधांविषयी कुणकुण लागली होती. त्यानंतर त्याने सुमान आणि इतर साथीदारांच्या मदतीने 23 वर्षीय प्रिन्सच्या हत्येचा कट रचला. त्याचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह साहिबाबाद इंडस्ट्रिअल एरियामधील नाल्यात फेकला.

संबंधित बातम्या :

गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं, अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ कसं उकललं?

सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला

पतीच्या हत्येची प्रियकराला सुपारी, मुंबईत विवाहितेसह बॉयफ्रेण्डला बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.