Murder | पाणीपुरी घेऊन नवरा घरी पोहोचला, गर्भवती पत्नी बाथरुममध्ये मृतावस्थेत

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिबाबाद डीएलएफ परिसरातील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. गरोदर महिलेचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला.

Murder | पाणीपुरी घेऊन नवरा घरी पोहोचला, गर्भवती पत्नी बाथरुममध्ये मृतावस्थेत
गर्भवतीची हत्या
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 5:31 PM

गाझियाबाद : गाझियाबादच्या (Ghaziabad Crime News) साहिबाबादमध्ये एका गर्भवती महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली. अज्ञात चोरट्यांनी महिलेचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर दरोडा (Robbery) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात उपस्थित असलेल्या वृद्ध सासूला बाल्कनीत कोंडून ठेवण्यात आले होते. घटनेच्या वेळी महिलेचा पती ऑफिसला गेला होता. बायकोसाठी पाणीपुरी घेऊन तो घरी पोहोचला, त्यावेळी हे धक्कादायक दृश्य त्याला पाहायला मिळाले. या हत्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिबाबाद डीएलएफ परिसरातील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. गरोदर महिलेचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला. डीएलएफ कॉलनीतील आशीर्वाद अपार्टमेंट बिल्डिंगमधील घर क्रमांक 17 ब्लॉक ए-31 मध्ये राहणारे संतोष कुमार शुक्रवारी त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यांची 20 वर्षीय पत्नी संतोषी उर्फ ​​सोनू आणि वृद्ध आई घरी होते.

मयत महिला एक महिन्याची गर्भवती

रात्री संतोष बाजारातून पत्नीसाठी पाणीपुरी घेऊन घरी पोहोचले असता घरातील वीज बंद असल्याचे त्यांना दिसले. आवाज दिल्यावर त्यांना समजलं की आई घराच्या बाल्कनीत बंद होती, तर पत्नीचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये असल्याचे त्यांना आढळून आले. महिलेचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. घरातील वॉर्डरोबमधील वस्तू विखुरलेल्या होत्या. संतोषच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी एक महिन्याची गर्भवती होती. वरील फ्लॅटमध्ये राहणारे मजूर आणि त्याचा ठेकेदार विपीन यांच्यावर खून आणि दरोड्याचा संशय पतीने व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. एसपी सिटी आणि गाझियाबाद ट्रान्स हिंडनचे एसएसपीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी कामावरून घरी परतलेल्या महिलेच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला असून घराचे कपाट व लॉकर तुटलेले आढळून आले.

प्राथमिक तपासात दरोड्याच्या वेळी खून झाल्याचा संशय आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी सिटीच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.