Uttar Pradesh Murder | विवाहबाह्य संबंधातून पतीची निर्घृण हत्या, महिला, प्रियकर आणि मित्राला अटक

1 मे रोजी चूर्णात गुंगीची गोळी मिसळून तिने पतीला खाऊ घातली, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. मग प्रियकराला तिने फोन केला. प्रियकर आणि त्याच्या मित्राने बेशुद्ध असलेल्या पतीचा चादरीने गळा आवळून खून केला.

Uttar Pradesh Murder | विवाहबाह्य संबंधातून पतीची निर्घृण हत्या, महिला, प्रियकर आणि मित्राला अटक
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून कुऱ्हाडीने सपासप वार
Image Credit source: टीव्ही 9
| Updated on: May 13, 2022 | 1:12 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) गाझियाबादमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 मे रोजी झालेल्या हत्येचे गूढ (Ghaziabad Murder Case) उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. तरुणाच्या पत्नीने पतीला गुंगीचे औषध पाजले. पती बेशुद्ध पडल्यावर त्याने प्रियकराच्या साथीने त्याची गळा आवळून हत्या (Husband Murder) केल्याचा आरोप केला जात आहे. आरोपी कुसुमने चौकशीदरम्यान सांगितले की, तिचे मनोजसोबत प्रेमसंबंध होते.

काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकारी आलोक दुबे यांनी सांगितले की, मयत राकेश शर्मा हा त्याची पत्नी कुसुमसोबत नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन बस्ती कॉलनीत राहत होता. 1 मे रोजी रात्री कुसुमने राकेशचा भाऊ मुकेश याला फोन करून सांगितले की, आपला नवरा बेशुद्ध पडला आहे, तो काही बोलू शकत नाहीये. रात्रीच मुकेश आणि त्याचे कुटुंब गाझियाबादला आले. त्यांनी राकेशला गाझियाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नातेवाईकांना संशय

यानंतर राकेशचा मृतदेह कुटुंबीयांनी बुलंदशहर जिल्ह्यातील परळी गावात नेला. दोन मे रोजी सकाळी मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात राकेशचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून नंदग्राम पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

पत्नीने सांगितला घटनाक्रम

पोलीस तपासात कुसुमने सांगितले की, ती 10 महिन्यांपूर्वी मनोजसोबत पळून गेली होती. राकेशच्या सांगण्यावरून ती पाच महिन्यांनी परत आली. 1 मे रोजी चूर्णात गुंगीची गोळी मिसळून तिने पती राकेशला खाऊ घातली, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर प्रियकर मनोज चौहान याला तिने फोन केला. मनोज आणि त्याचा मित्र गौरव यांनी बेशुद्ध असलेल्या राकेशचा चादरीने गळा आवळून खून केला.

आलोक दुबे यांनी सांगितले की, या हत्येप्रकरणी मयत पती राकेश शर्माची पत्नी कुसुम, तिचा प्रियकर मनोज चौहान आणि त्याचा मित्र गौरव चौहान यांना अटक करण्यात आली आहे. मनोज आणि गौरव हे बुलंदशहर जिल्ह्यातील बीबीनगर पोलीस ठाण्याच्या मोहल्ला चौहानपुरी येथील रहिवासी आहेत.