Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh Crime | आजी-आजोबांच्या अपमानाचा सूड, नातवाने असा काढला तरुणाचा काटा

मोतीलाल अनेकदा त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. जर मोतीलालने आपल्या आजी-आजोबांचा जीव घेतला, तर त्यांच्या मृत्यूनंतर आपण एकटे पडू, अशी भीती आरोपी तरुणाला सतावत होती.

Uttar Pradesh Crime | आजी-आजोबांच्या अपमानाचा सूड, नातवाने असा काढला तरुणाचा काटा
कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:42 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील बांदा (Uttar Pradesh Crime) येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आजी-आजोबांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा बदला नातवाने हत्या (Murder) करुन घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सूड उगवण्यासाठी (Revenge) आपण आजी-आजोबांना धमकी देणाऱ्याला सोबत घेतले, आधी त्याला दारु प्यायला लावली, नंतर पंचाने गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह नाल्यात फेकला आणि घटनास्थळावरून पळ काढला, असं चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं.

काय आहे प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशातील बिसांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पराबिहारी गावात घडली आहे. आरोपी तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्याचे आजी-आजोबा असे दोघेच घरी राहतात. मोतीलाल अनेकदा त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. जर मोतीलालने आपल्या आजी-आजोबांचा जीव घेतला, तर त्यांच्या मृत्यूनंतर आपण एकटे पडू, अशी भीती आरोपी तरुणाला सतावत होती.

हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला

त्यामुळे त्याने मोतीलालची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून बाईक आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 2 मे रोजी पारा बिहारी येथील तिमुडिया नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पेस्ता गावात राहणाऱ्या मोतीलालचा मृतदेह असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

वडिलांची हत्या, काका तुरुंगात

एएसपी म्हणाले की, हत्येचा आरोपी अरविंद कुमार याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने सांगितले की, त्याचे वडील बदलेश यांची 2016 मध्ये हत्या झाली होती, काका तुरुंगात आहेत. त्याच्या घरात फक्त आजोबा आणि आजी आहेत, ज्यांच्यावर तो खूप प्रेम करतो. मात्र शेजारी राहणारा मोतीलाल हा वारंवार त्यांचा अपमान करायचा. यामुळे तो खूप दुःखी झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

संबंधित बातम्या

समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुण्यातल्या मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटेंना जामीन तर मंजूर, पण कोर्टानं घातली अट…

Solapur | CNG पंपावर गॅस भरताना स्फोट, वाहन चालकाने गाडी पुढे नेली अन् पाइपच उखडला !

विलेपार्ले पश्चिमेच्या एलआयसी ऑफिसला आग, महत्वाचे दस्ताऐवज जळाल्याची भीती

'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.