लखनौ : कुत्र्याला गाडीने धडक दिल्याच्या कारणावरुन टोळक्याने तुफान राडा (Ruckus) घातला. वादावादीनंतर सात जणांच्या टोळक्याने कार चालकासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करत दगडफेक (Stone Pelting) केली. यामध्ये चौघं जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये (Uttar Pradesh Crime News) दनकौर कसबे येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टोळक्याने चौघा जणांवर दगडफेक आणि गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. या हल्ल्यात कार चालक आणि त्याच्या कुटुंबातील आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुत्र्याला गाडीने उडवल्याच्या कारणावरुन काही जणांनी तुफान दगडफेक केली. वादावादीनंतर टोळक्याने कार चालकासह त्याच्या कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण केली. यामध्ये चौघं जण गंभीररित्या जखमी झाले असून प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. यापैकी तिघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पीडित बृजेश सैनी कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री ते काम संपवून घराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी गावापासून काही अंतरावर भर रस्त्यातच खुर्ची टाकून काही जण बसले होते. त्यांना वाचवण्याच्या नादात सैनींची गाडी एका कुत्र्याला धडकली.
कुत्र्याला धडक दिल्याचं पाहून तिथे बसलेल्या लोकांनी कारला घेराव घातला आणि सैनींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर काही जणांनी त्याचं घर गाठून हल्ला चढवला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तक्रारीत सात जणांची नावं आहेत. त्यापैकी तिघा जणांना अटक कऱण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
मैत्रिणीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, हल्ल्यात पीडित गंभीर जखमी
आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली
Bar Dancer Attacked | मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला, एक्स बॉयफ्रेण्ड पसार