लायब्ररी सांगून OYO Hotel मध्ये गेली, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आई-वडिलांना तीन पानी चिठ्ठी

लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जात असल्याचं सांगून बुधवारी दुपारी शिवानी घराबाहेर पडली. संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. तिला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही ती फोन उचलत नव्हती

लायब्ररी सांगून OYO Hotel मध्ये गेली, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आई-वडिलांना तीन पानी चिठ्ठी
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 11:17 AM

नोएडा : बीटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या (Student Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडामध्ये हा प्रकार समोर आला. ओयो हॉटेलच्या (OYO Hotel) रुममधील पंख्याला गळफास घेत तरुणीने आयुष्य संपवलं. शिवानी गुप्ता असं 22 वर्षीय मयत विद्यार्थिनीचं नाव होतं. ती नोएडातील रजत विहार कॉलनीची रहिवासी होती. ती जेपी इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकी विषयाचं शिक्षण घेत होती. नोएडामध्ये ती आई-वडील आणि भावासोबत राहत होती. ओयो हॉटेलच्या रुममध्ये आपली आयुष्ययात्रा संपवताना शिवानीने ‘I Love You मम्मी पापा’ अशी सुसाईड नोट लिहिल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जात असल्याचं सांगून बुधवारी दुपारी शिवानी घराबाहेर पडली. संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. तिला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे शिवानीसोबत काहीतरी बरे-वाईट घडल्याची शंका कुटुंबीयांना आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

शिवानीच्या लास्ट लोकेशनवरुन शोध

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सेक्टर 58 च्या पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सच्या आधारे शिवानीचा शोध सुरु केला. शिवानीचं लोकेशन सेक्टर 56 मधील ओयो हॉटेलमध्ये दिसू लागलं. पोलिसांनी तिथे धाव घेतली असता शिवानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

तीन पानी सुसाईड नोट

शिवानीने तिच्या ओढणीने गळफास घेत जीव दिला होता. पोलिसांना तिच्याजवळ तीन पानी सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये तिने ‘आय लव्ह यू पापा, आय लव्ह यू मम्मी’ असं लिहिलेलं सापडलं. कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं तिने चिठ्ठीत लिहिलं आहे.

पोलिसांनी शिवानीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेत फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहे. तर तिचा मृतदेह पोस्टमार्टमला पाठवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या, नांदेडमध्ये खळबळ

बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना

‘जीवनदायिनी’ वैनगंगा ठरतेय ‘मृत्यूवाहिनी’, दीड वर्षांत नदीत 17 आत्महत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.