#क्राईम_किस्से : Syed Modi Murder | बॅडमिंटनपटू सय्यद मोदीची 26 व्या वर्षी झालेली हत्या, पत्नी-प्रियकर होते संशयाच्या भोवऱ्यात

मुलीच्या जन्मानंतर दोनच महिन्यांनी सय्यद मोदीची हत्या झाली. 28 जुलै 1988 च्या संध्याकाळी सय्यद नेहमीच्या सरावानंतर लखनौच्या केडी सिंह बाबू स्टेडियमच्या बाहेर येत असताना त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते

#क्राईम_किस्से : Syed Modi Murder | बॅडमिंटनपटू सय्यद मोदीची 26 व्या वर्षी झालेली हत्या, पत्नी-प्रियकर होते संशयाच्या भोवऱ्यात
सय्यद मोदी (डावीकडे) संजय सिंह-अमिता सिंह
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 7:45 AM

मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता, नॅशनल चॅम्पियन बॅडमिंटनपटू सय्यद मोदी (Syed Modi) याची वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. 28 जुलै 1988 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सराव सत्रानंतर के. डी. सिंह बाबू स्टेडियममधून बाहेर पडताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याची पत्नी अमिता सिंह आणि तिचा तत्कालीन प्रियकर (सध्या पती) संजय सिंह यांच्यावर हत्येचा आरोप झाला होता. मात्र नंतर दोघांचीही निर्दोष सुटका करण्यात आली होती.

कोण होता सय्यद मोदी?

1976 मध्ये फक्त 14 वर्षांचा असताना सय्यद मोदी ज्युनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन बनला होता. त्यानंतर सय्यद सलग आठ वेळा राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन राहिला होता (1980-1987) आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्किटमध्ये त्याची सर्वात उल्लेखनीय कामगिरी 1982 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या रुपात समोर आली. त्याने ऑस्ट्रियन इंटरनॅशनल (1983 आणि 1984) आणि यूएसएसआर इंटरनॅशनल (1985) यासारखी इतर तीन आंतरराष्ट्रीय जेतेपदेही जिंकली होती, या दोन्ही युरोपियन बॅडमिंटन सर्किट स्पर्धा होत्या.

सय्यद-अमीता यांचा विवाह

1978 मध्ये, ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन असताना, 16 वर्षीय सय्यद मोदीची निवड चीनमधील बीजिंग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. त्यावेळी अमिता कुलकर्णी नावाची त्याच्याच वयाची बॅडमिंटनपटू महिला संघात होती. सय्यद मोदी उत्तर भारतातील मुस्लिम, तर अमिता ही महाराष्ट्रातील हिंदू. कॉस्मोपॉलिटन मुंबई शहरात ती लहानाची मोठी झाली होती. ती एका श्रीमंत, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित कुटुंबातील होती. सय्यद मोदीपेक्षा तिची पार्श्वभूमी खूपच वेगळी होती.

कुटुंबीयांचा विरोध

साहजिकच, सय्यद आणि अमिता यांच्यातील विवाहाला दोन्ही कुटुंबांचा कट्टर विरोध होता. केवळ त्यांच्या पार्श्वभूमीतील प्रचंड तफावत, हे विरोधाचे एकमेव कारण नव्हते, तर दोन महत्त्वाकांक्षी बॅडमिंटनपटूंच्या वैवाहिक जीवनात व्यावसायिक मत्सर आणि हेवेदावे यासारखे घटक समस्येचे कारण ठरतील, असाही त्यांचा अंदाज होता. परंतु सय्यद आणि अमिता आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी एका रजिस्ट्री कार्यालयात घाईघाईने लग्नही केले.

दरम्यान, कुटुंबाच्या ठोकताळ्यानुसार लग्न होताच या जोडप्याच्या जीवनात अनेक समस्या तोंड वर काढू लागल्या. व्यावसायिक मत्सरासोबतच धार्मिक मुद्द्यांतील तफावतीचेही संकेत केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) अहवालात दिले गेले होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री. ते म्हणजे माजी खासदार संजय सिंह.

पती पत्नी और वोह

संजय सिंह ही एक अत्यंत श्रीमंत असामी. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते वर्गमित्र, निकटवर्तीय आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाशी संबंधित एक प्रमुख राजकारणी. अमिता आणि संजय सिंह 1984 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यावेळी संजय सिंह विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंही होती. तर अमिता-सय्यद मोदी यांच्या लग्नालाही तेव्हा बरीच वर्ष झाली होती, मात्र त्यांना त्यावेळी अपत्यप्राप्ती झाली नव्हती. सय्यद अमितावर विवाहबाह्य संबंधांचा संशय घेत असल्याचाही उल्लेख काही रिपोर्ट्समध्ये आढळतो.

मुलीचा जन्म

दरम्यान, अमिता गरोदर राहिल्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे भूत वाढू लागले. सीबीआयच्या अहवालानुसार, सय्यदला संशय होता की हे मूल त्याचे नाही, तर संजय सिंह यांच्यासोबत अमिताच्या अफेअरचा हा परिणाम आहे. संशयाला कंटाळून अमिता मुंबईत तिच्या पालकांच्या घरी गेली. मे 1988 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. अमिताने तिला आकांक्षा असे हिंदू नाव दिले. त्यानंतर तिने आपल्या बाळाला तिच्या पालकांजवळ मुंबईतच ठेवले आणि ती लखनौला परत आली. बॅडमिंटनचा सराव सुरू ठेवण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर फॉर्ममध्ये परतण्याची तिची तयारी होती. सय्यदने या सर्व परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. वैयक्तिक आयुष्यातील वादळांचा परिणाम त्याच्या क्रीडा कामगिरीवरही झाला होता. 1980 ते 1987 अशी सलग आठ वेळा जिंकलेली राष्ट्रीय ट्रॉफी त्याने 1988 मध्ये गमावली होती.

मुलीच्या जन्मानंतर दोनच महिन्यांनी सय्यद मोदीची हत्या झाली. 28 जुलै 1988 च्या संध्याकाळी सय्यद नेहमीच्या सरावानंतर लखनौच्या केडी सिंह बाबू स्टेडियमच्या बाहेर येत असताना त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. वयाच्या 26 व्या वर्षीच सय्यद मोदीची तुलना प्रकाश पादुकोण यांच्यासारख्या सुपरस्टारशी केली गेली असल्याने भारतातील बॅडमिंटन आणि क्रीडा वर्तुळासाठी हा एक मोठा धक्का मानला गेला.

पत्नी-प्रियकराला अटक

हत्येच्या काही दिवसांतच सय्यदची ‘व्यभिचारी’ पत्नी आणि तिच्या प्रियकराला सीबीआयने अटक केली होती. सीबीआयच्या चौकशीनंतर आरोपपत्रात सात जणांची नावे देण्यात आली होती, ज्यात सय्यदची पत्नी अमिता मोदी आणि प्रियकर संजय सिंह यांचा समावेश होता. विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांनी सय्यदचा खून केल्याचा संशय होता, परंतु अमिता मोदी आणि संजय सिंह यांच्याविरुद्धचा कटाचा खटला वगळण्यात आला. अखिलेश सिंह आणि जितेंद्र सिंह यांना स्वतंत्रपणे निर्दोष सोडण्यात आले. इतर आरोपींपैकी दोघे – अमर बहादूर सिंग आणि बलाई सिंह – त्यांच्या सहभागाचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर भगवती सिंह याला हत्या आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी आढळल्याने दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

पुराव्याअभावी सुटल्यानंतर थोड्याच दिवसात अमिताने तिचा प्रियकर संजय सिंहशी लग्न केले. संजय सिंह आधीपासूनच राजकारणात सक्रिय होता. त्याने उत्तर प्रदेशातून दोन वेळा आमदारकी भूषवली होती, तर राज्यात मंत्रिपदाचीही झूल पांघरली होती. त्याने एकदा राज्यसभेवर खासदारकीही भूषवली आहे. त्यानंतर पत्नी अमिता सिंहलाही त्याने राजकारणात आणलं. तिने यूपीतील अमेठी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदारपद मिळवलं आहे.

संबंधित बातम्या :

लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत

अनेक दिवसांच्या पाठलागानंतर बोलण्याचा प्रयत्न, मात्र तेव्हा जे घडलं, त्यामुळे विजय राधिकाच्या जीवावरच उठला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.