पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले, पतीचं टोकाचं पाऊल

चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे संजीव यादवसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्याला लागली होती. त्याने संजीव आणि आपल्या पत्नीला अनेकदा समजावूनही सांगितले, पण ते दोघेही ऐकायला तयार नव्हते.

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले, पतीचं टोकाचं पाऊल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 8:03 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशात नोएडा (Noida Uttar Pradesh) येथील एका घरात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उकल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या पत्नीशी मयत तरुणाचे अनैतिक संबंध (Extra Marital Affair) होते. याच रागातून आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या प्रकरणाचा (Murder) उलगडा करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती हा मृतदेह संजीव यादव नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी चंद्रभानने एके दिवशी त्याची पत्नी आणि मयत संजीव यादव यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने संजीव यादव याचा गळा आवळून खून केला.

काय आहे प्रकरण?

संजीव यादव मूळचा उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी होती. मात्र तो सध्या नोएडातील फेस टू येथील एका घरात भाड्याने राहत होता.  दरम्यानच्या काळात एका विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध जुळल्याचे तपासादरम्यान पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या पतीकडे कसून चौकशी केली, तेव्हा हे हत्येचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी हत्या प्रकरणात आरोपी पती चंद्रभान याला अटक केली आहे.

पत्नीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले

चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे संजीव यादवसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्याला लागली होती. त्याने संजीव आणि आपल्या पत्नीला अनेकदा समजावूनही सांगितले, पण ते दोघेही ऐकायला तयार नव्हते. एकदा त्याने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्यानंतर तो संजीव यादवच्या घरी पोहोचला आणि त्याने यादवची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी चंद्रभानला अटक केली असून त्याच्याकडून संजीव यादवचे आधारकार्ड आणि हायस्कूलची गुणपत्रिकाही जप्त केली आहे.

संबंधित बातम्या :

हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या, चार वर्षांपासून रुम बुक करणारा मित्र संशयाच्या भोवऱ्यात

चार वर्षांपासून रिलेशनमध्ये, प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिला, प्रियकराने थेट…

प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.