चार वर्षांपासून रिलेशनमध्ये, प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिला, प्रियकराने थेट…

रवी आणि शालिनीचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता, असं रवीने चौकशीदरम्यान सांगितलं. मात्र शालिनीचा मोबाईल तपासला, तेव्हा त्याला हादराच बसला. कारण ज्या शालिनीवर तो जीव लावत होता, तिचे इतर मुलांसोबतचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ त्याला पाहायला मिळाले होते.

चार वर्षांपासून रिलेशनमध्ये, प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिला, प्रियकराने थेट...
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 7:30 AM

लखनौ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज येथील शालिनी धुरिया उर्फ ​​रोली हत्या प्रकरणात (Murder) खळबळजनक खुलासा करत पोलिसांनी या प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शालिनीच्या प्रियकराला (Boyfriend) अटक केली आहे. चार वर्षांपासून शालिनीसोबत रिलेशनशीपमध्ये असलेला बॉयफ्रेण्ड रवी ठाकूर याने तिची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शालिनीचे अन्य कोणासोबत संबंध असल्याचा रवीला संशय होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रवीने व्हॅलेंटाइन डेच्या रात्रीच शालिनीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर रवी ठाकूर याने शालिनीचा मृतदेह एका गोणीत भरुन शिवून घेतला. नंतर मृतदेह सायकलवरुन नेत पोलो ग्राऊंडवर बांधलेल्या विहिरीत फेकून दिला.

काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी रवी ठाकूर (24) हा मूळ बिहारच्या जेहानाबादमधील मकदुमपूर डीहचा रहिवासी आहे. सध्या रवी प्रयागराज येथे राहतो. प्रयागराज पोलिसांनी बुधवारी मिंटो पार्कजवळून रवीला अटक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या चौकशीत रवीने बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने पोपटाप्रमाणे आपल्या कृत्यांचा पाढा वाचला. हे ऐकून पोलिसही हादरुन गेले. रवी आणि शालिनीचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता, असं रवीने चौकशीदरम्यान सांगितलं.

प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ

पोलिसांच्या चौकशीत रवी ठाकूरने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याचे शालिनीवर मनापासून प्रेम होते. गेल्या 4 वर्षांपासून ते दोघं रिलेशनशीपमध्ये होते. 14 फेब्रुवारीला सकाळी शालिनी दिल्लीहून प्रयागराजला आली, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ती ट्रेनने उतरली होती. यानंतर रवी तिला घेऊन लोको कॉलनी येथील घरी आला. रवीने सांगितले की, शालिनी फ्रेश होण्यासाठी वॉशरुममध्ये गेली होती, तेव्हा त्याने तिचा मोबाईल तपासला, तेव्हा त्याला हादराच बसला. कारण ज्या शालिनीवर जीव लावत होता, तिचे इतर मुलांसोबतचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ त्याला पाहायला मिळाले. आपल्या प्रेयसीचे इतर मुलांशीही संबंध असल्याचा रवीला संशय होताच. ही गोष्ट त्याच्या मनात घर करुन गेली होती. शालिनी आपली फसवणूक करत असल्याची रवीची खात्री झाली.

शालिनीचा गळा आवळून खून

रवी ठाकूरला त्याच्या प्रेयसीचे इतर कोणत्याही मुलाशी असलेले संबंध सहन होत नव्हते. शालिनी वॉशरूममधून बाहेर आल्यावर रवी ठाकूरने तिचा गळा आवळून खून केला. हत्येच्या सहा दिवसांनी म्हणजेच 20 फेब्रुवारीला सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन हद्दीतील पोलो ग्राऊंडच्या विहिरीतून एका तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, त्या दिवशी तिची ओळख पटू शकली नाही. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर काहीतरी अनुचित प्रकार घडल्याच्या भीतीने बेपत्ता शालिनीचे आई-वडील मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी मृतदेह त्यांची मुलगी शालिनी हिचा असल्याची ओळख पटवली.

संबंधित बातम्या :

खेड घाटातील 28 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं, मित्रांनी आधी दारु पाजली मग…

आईने बापाचा खून केला, पाच मुलं पोरकी, पोलिसातलं ‘मातृत्व’ जागं झालं, पाचही लेकरं दत्तक

महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.