
उत्तरप्रदेश : राज्यात अनेक क्राईमच्या (Crime news) घटना घडत असतात. प्रत्येक घटनेत एक वेगळ कारण असतं निर्दशनास आलं आहे. एका तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून तरुणाने पाच वर्षे बलात्कार केल्याचं पोलिस (UP police) स्टेशनमध्ये दाखल झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. हिमांशु राजभर (Himanshu Rajbhar) असं तरुणाचं नाव असून पोलिस त्याची चौकशी करीत आहेत. तरुणीचा लग्नाला नकार दिल्याची तक्रार दुबहर पोलिसांच्याकडे नोंद झाली आहे.
हिमांशु राजभर या तरुणाने तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर मागच्या पाच वर्षापासून तो तिच्यासोबत असायचा. लग्न करतो असं वारंवार सांगून त्याने तरुणीवर बलात्कार केला अशी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी 376 कायद्यान्वये तरुणाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तरुणाची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्याचबरोबर तरुणीला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तरुणीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देशात आतापर्यंत असे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.