‘सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं..’ लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली, की…

| Updated on: Apr 07, 2025 | 2:52 PM

लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली की, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगी लग्न करुन ज्या घरात जाणार होती, ते कुटुंब अशा विचाराच होतं की खरच लाज वाटेल.

सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं.. लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली, की...
Marriage
Image Credit source: TV9 Hindi
Follow us on

घरात लग्न असेल, तर नवरा-नवरी इतकेच घरातील इतर सदस्यही उत्साहित असतात. यूपीच्या फिरोजाबाद येथील घरात लग्नाचा उत्साह होता. घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरु होती. त्याचवेळी मुलाच्या पित्याचा होणाऱ्या सूनबाईला फोन आला. त्यांनी होणाऱ्या सूनेला सांगितलं, सूनबाई माझं म्हणणं नीट ऐक, तुझ्या वडिलांना सांग, आम्हाला हुंड्यामध्ये 10 लाख रुपये पाहिजेत, अन्यथा दारात वरात येणार नाही.

सासऱ्याच्या तोंडून असे शब्द ऐकून होणाऱ्या सूनेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने वडिलांकडे फोन दिला. वडिल नवरदेवाच्या पित्याशी बोलले. त्यावेळी नवरदेवाचे वडिल म्हणाले की, आम्ही त्याचवेळी वरात घेऊन येऊ, जेव्हा आम्हाला हुंड्यामध्ये 10 लाख रुपये मिळतील. मुलीच्या वडिलांनी त्यांना आपली अडचण सांगितली. ते म्हणाले की, मी इतके पैसे कुठून आणू?. माझ्याकडे इतका पैसा नाही. सर्व पैसे लग्नासाठी खर्च केलेत. मुलाच्या वडिलांनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही, थेट फोन कट केला.

त्यानंतर वरात आलीच नाही

मुलीचे वडिल नंतर मुलाच्या घरी गेले. पैसे देण्यात असमर्थता व्यक्त केली. बरच त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच विनवण्या करुनही वरपक्ष काहीही ऐकून घेत नव्हता. त्यावेळी मुलाकडच्यांनी मुलीकडच्या नातेवाईकाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. त्यानंतर वरात आलीच नाही. प्रकरण पोलीसात गेल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंना समजावलं. आता दोन्ही बाजू तडजोडीने मार्ग काढण्याविषयी बोलत आहेत.

लग्न कधी होतं?

हे प्रकरण रसूलपुरच आहे. मुलीच लग्न 6 एप्रिल रोजी होणार होतं. पण वरातच आली नाही. वरात न येण्यामागच कारण हुंडा होतं. लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या वडिलांनी फोन करुन 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसा मिळाला नाही, म्हणून ते वरात घेऊन आले नाहीत. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. दोन्ही बाजू आता तडजोडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत. लग्न होणार की, नाही? हे अजून अनिश्चित आहे.