उत्तर प्रदेश : मुलीची छेड काढणाऱ्याविरोधात तक्रार करणे जीवावर बेतलं, हाथरसमध्ये पित्याची गोळ्या झाडून हत्या

छेड काढणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पित्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली (Father Killed By Goons).

उत्तर प्रदेश : मुलीची छेड काढणाऱ्याविरोधात तक्रार करणे जीवावर बेतलं, हाथरसमध्ये पित्याची गोळ्या झाडून हत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 7:49 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या हाथरसमद्ये पुन्हा एकदा एक अप्रिय घटना घडली आहे (Father Killed By Goons). येथे मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करणे एका पित्याच्या जीवावर बेतलं आहे. तक्रार केली या रागातून छेड काढणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पित्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली (Father Killed By Goons).

पित्याचा गुन्हा हा होता की त्याने आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या गुंडांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यामुळे गुंडांचा पारा चढला आणि त्यांनी गोळ्या झाडत पित्याची हत्या केली. सोमवारी उशिरा रात्री शेतात जाऊन या गुंडांनी पित्याची हत्या केली.

हाथरस जिल्ह्यातील सासनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नौजरपूर गावात सोमवारी (1 मार्च) रात्री पिता अमरीश आपल्या शेतात बटाटे काढण्याचं काम सुरु होतं. तेव्हा तिथे चार गुंडांनी येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अमरीश यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेतात फायरिंग झाल्याने मजुरांमध्ये एकच खळबळ माजली.

पित्यासाठी न्यायाची मागणी

अमरीश यांची मुलगी जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा पित्याचा मृत्यू झालाचं पाहून तिला धक्काच बसला. तेव्हा मुलीने सर्व हकीगत रुग्णालयात रडत रडत पोलिसांना सांगितली. तिने आपल्या पित्यासाठी न्यायाची मागणी केली आहे (Father Killed By Goons).

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ‘माझ्यासोबत काही गुंडांनी छेडछाड केली होती. त्याची तक्रार पित्याने पोलिसांत केली होती. यामुळे त्या गुंडांनी माझ्या पित्याची गोळ्या झाडून हत्या केली’. तिने दिलेल्या माहितीनुसार, गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून पित्याची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी गाव गाठलं. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. डीएसपी रुची गुप्ता यांनी सांगितलं की, याप्रकरणी कुटुंबाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहे.

Father Killed By Goons

संबंधित बातम्या :

समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं

मुंबई पोलिसांची कमाल, 77 वर्षीय महिलेच्या हत्याप्रकरणी चार दिवसांमध्ये आरोपींना बेड्या

पोलीस निरीक्षकाच्या दालनातच चाकू हल्ला; कराड शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.