आग्रा | 13 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये अतिशय भयानक, संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. फेज टूमध्ये एका होम स्टे मध्ये एका तरूणीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. पाच जणांनी त्या तरूणीवर अत्याचार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोंपीपैकी एक जण हा त्या तरूणीला आधीपासून ओळखत होता, तो तिचा मित्र होता. आरोपींनी तरूणीला दार पाजण्याचा प्रयत्न केला मात्र तिने विरोध दर्शवल्यावर तिला बेदम मारहाण केली. आणि तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
बचावासाठी ती तरूणी ओडत राहिली, विनंती करत राहिली पण ते थांबले नाहीत. अखेर त्या तरूणीचा आवाज, आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले आणि कोणीतरी पोलिसांना कळवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तेव्हा त्या तरूणीची अवस्था अतिशय वाईट होती. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी 5आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या तरूणीला मारहाणही झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बचावासाठी विनंती करत आहे. ही घटना शनिवारी रात्री उघड झाल्याचे समजते.
#WATCH | Agra | On the basis of a complaint from a woman, five people have been arrested and a case registered under the section of rape and other relevant sections of IPC. The incident took place in a homestay accommodation in Basai, Tajganj area: Assistant Commissioner of… pic.twitter.com/ASELdrFfME
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 13, 2023
ब्लॅकमेल करत होते आरोपी
आरोपींपैकी एक जण त्या तरूणीला आधीपासून ओळखत होता. एका आरोपीने तिचा अश्लील व्हिडीओ बनवला होता, असे पीडितेने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्या व्हिडीओद्वारे तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. शनिवारी आरोपी जितेंद्र आणि त्याचे चार मित्र तिच्या घरी आले. त्यांनी पीडितेला जबरदस्ती दारू पाजली. आणि नंतर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पलिस तेथे पोहोचले असता, पीडित तरूणीची अवस्थआ अतिशय वाईट होती. रडून-रडून तिचे हाल झाले. महिला पोलिसांनी तिला कसंबसं शांत केलं.
पोलिसांनी चौघांना केली अटक
पीडित तरूणी रहात असलेल्या होम स्टेच्या ऑपरेटरचे नाव रवी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्याचीही चौकशी करत आहेत. घटनेनंतर आरोपी पळून गेले. मुलगी मदतीसाठी याचना करत होती, तिचा आवाज ऐकून काही लोक मदतीला आले. तेवढ्यात कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.