पत्नीनेच स्वतःचं कुंकू पुसलं, नवऱ्याला कसं संपवलं पाहून तुम्हाला धक्काच बसेल !

दुबईला नोकरी करणारा तरुण सुट्टीवर घरी आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेहच तलावात आढळला. पोलिसांना नेमके काय घडले याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र पोलीस झडतीत एक गोष्ट हाती लागली आणि सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.

पत्नीनेच स्वतःचं कुंकू पुसलं, नवऱ्याला कसं संपवलं पाहून तुम्हाला धक्काच बसेल !
अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 4:56 PM

गोरखपूर : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे उघडकीस आली आहे. अखेर ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. रामानंद विश्वकर्मा असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र अशा तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना याप्रकरणात कोणतेच धागेदोरे मिळत नव्हते. मात्र एक डायरी पोलिसांच्या हाती लागली अन् सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.

डायरीने उलगडले हत्येचे रहस्य

एका डायरीच्या सहाय्याने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर पोलिसांनी या हत्येचे गूढ उकलले. पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने 6 मार्च रोजी अनैतिक संबंधांसाठी कट रचून आपल्या पतीला दूर केले. गोरखपूरच्या गिडा भागातील मल्हीपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रात्री पत्नीने नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून खाऊ घातल्या. यामुळे पती गाढ झोपला.

हत्या करुन मृतदेह तलावात फेकला

यानंतर रात्री एकच्या सुमारास प्रियकर त्याच्या मित्रासह महिलेच्या घरात आला. मग तिघांनी तरुणाची हत्या करुन मृतदेह पोखराजवळ तलावात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तलावात मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरु केली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना घटनास्थळावरुन काहीही हाती लागले नाही. यामुळे पोलिसांनी रामानंदच्या खोलीची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती रामानंदच्या पत्नीची डायरी मिळाली. या डायरीत रामानंदचे आणि पत्नीचे संबंध चांगले नसल्याचे लिहिले होते. तसेच डायरीत पोलिसांना महिलेचा प्रियकरासोबत फोटोही सापडला. यानंतर पोलिसांना पत्नीवर संशय बळावला.

पत्नीने दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी रामानंदच्या पत्नीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या नणंदेचा दिर बृजमोहनशी आपले प्रेमसंबंध जुळले. दोघांना एकत्र रहायचे होते म्हणून त्या दोघांनी रामानंदला आपल्या मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचे पत्नीने पोलीस चौकशीत सांगितले. यात बृमोहनच्या मित्रानेही मदत केली.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.