खचाखच भरलेली बस एक्स्प्रेस वे-वर धावत होती, तेवढ्यात ड्रायव्हरला आला हार्ट ॲटॅक आणि…

एक्स्प्रेस वेवर धावणारी बस प्रवाशांनी खचाचखच भरली होती. भरधाव वेगाने ही बस चालत होती. सगळं काही ठीक सुरू होतं. मात्र एका क्षणात सगळंच पलटलं. बस ड्रायव्हरला अचानक हार्ट ॲटॅक आल्याने...

खचाखच भरलेली बस एक्स्प्रेस वे-वर धावत होती, तेवढ्यात ड्रायव्हरला आला हार्ट ॲटॅक आणि...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 2:40 PM

लखनऊ | 15 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका सरकारी बस ड्रायव्हरला बस चालवतानाच हार्ट ॲटॅक आला. भरधाव वेगाने ही बस एक्स्प्रेस वे वरून जात असतानाच ही घटना घडली. यावेळी बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. बस चालकाला हार्ट ॲटॅक (bus drive had heart attack) आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस मोठ्या खड्ड्यात जाऊन (bus accident) कोसळली. या दुर्घटनेत 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर गुरुवारी हा अपघात झाला.

एक्स्प्रेस वेवरून बस भरधाव वेगाने जात असतानाच बसच्या चालकाची तब्येत बिघडली. त्याला अचानक हार्ट ॲटॅक आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रेलिंगवर जाऊन आदळली आणि खड्ड्यात कशी पडली याचे भीषण दृश्य व्हिडीओमध्ये दिसते.

याप्रकरणी उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (UPSRTC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, ही बस मेरठ डेपोतून निघाली आणि गाझियाबादमधील कौशांबीच्या दिशेने जात होती. मात्र बस अर्ध्या रस्त्यात असतानाच हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या उपचारासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे यूपी स्टेट ट्रान्सपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बस चालवत असतानाच चालकाला हार्ट ॲटॅक आला होता, त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र त्यानंतरही त्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा कसून प्रयत्न केला आणि बस उलट होण्यापासून वाचवले.

ड्रायव्हरला आला हार्ट ॲटॅक, तोंडातून निघत होता फेस !

प्रदीप कुमार असे या बस ड्रायव्हरचे नाव आहे. या अपघातात बसचे कंडक्टक सुबोध कुमार हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर इतर प्रवाशांसोबतच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हायवे पेट्रोलिंग टीमने पाहिल्यानंतर हा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. अपघातानंतर काही वेळातच दुसरे पथक तेथे पोहोचले आणि जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. बस चालकाला हार्ट ॲटॅक आला होता, त्याच्या तोंडातून फेस येत होता, असे पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

अपघाताचे वृत्त कळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास करण्यात येईल. त्यानंतरच त्यामागेच कारण व इतर बाबी स्पष्ट होऊ शकतील, असे पोलिसांनी सांगितले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.