भाजीपाल्याप्रमाणे ‘त्यांना’ गोणीत कोंबलं… किडनॅपिंगच्या या घटनेमुळे सगळेच हादरले !

पिता-पुत्राने दोन मुलांचे अपहरण केले. यानंतर एका मुलाला गोणीत बांधून उसाच्या शेतात फेकण्यात आले, तर दुसरा मुलगाही तिथेच सापडला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

भाजीपाल्याप्रमाणे 'त्यांना' गोणीत कोंबलं... किडनॅपिंगच्या या घटनेमुळे सगळेच हादरले !
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 4:03 PM

लखीमपूर | 8 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये अपहरणाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाप-बेट्याच्या एका दुकलीने दोन लहान मुलांचं अपहरण केलं. आणि एखाद्या भाजीप्रमाणे त्यांना गोणीत कोंबून शेतात सोडून दिलं. आंगणवाडी केंद्रातून घरी येणाऱ्या त्या लहानग्यांच्या अपहरणामुळे सगळं गाव हादरलं.

नेहमीची वेळ उलटून गेल्यावरही मुलं घरी आली नाहीत म्हणून चिंतातूर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. थोड्या वेळाने त्यांना दूर एका शेतात एक मुलगा बसलेला दिसला. आणि तिथेच प्लास्टिकची एक गोणीही होती. ती उघडल्यानंतर त्यामधून दुसरा एक छोटा मुलगा बाहेर आल्याचे ते पाहून सगळे हादरले. बराच वेळ बंद गोणीत राहिल्याने त्याची तब्येत थोडी बिघडली होती. त्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

याप्रकरणाबद्दल समजताच पोलिस घटनास्थाळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण चौकशी करून पिता-पुत्रांना बेड्या ठोकत अटक केली. पण या संपूर्ण घटनेने गावात खलबळ माजली असून सगळीकडे या अपहरणाचीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही याबद्दल चर्चा चालली आहे. कुटुंबियांना तिथे पोहोचायला आणखी थोडा वेळ लागला असता, तर त्या निरागस मुलांचं काय झालं असतं, असाच प्रश्न सध्या सगळे विचारत आहेत. वेळेवर शोध लागल्याने त्यांचा जीव वाचला, नाहीतर…

बराच वेळ उलटूनही मुलं घरी आली नाहीत म्हणून…

लखीमपुर खीरी गावातील एग्घरा गावातील रहिवासी इंद्रपाल यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा अंकित (वय 4) आणि अवनीश यांचा मुलगा अनिकेत (वय 4) हे दोघेही गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या अंगणवाडी केंद्रात शिकण्यासाठी गेले होते.

तेथून ते दोघेही दहाच्या सुमारास घरी परत येतात. मात्र त्या दिवशी नेहमीची वेळ उलटून गेल्यावरही ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी मुलांचा शोध सुरू केला. ही मुले तर सकाळीच घरी गेली, असे अंगणवाडी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. यामुळे घरचे सगळेच घाबरले आणि त्यांनी व इतर ग्रामस्थांनी मुलांचा शोध सुरू केला.

बराच वेळ गावात शोध घेऊनही मुलं सापडली नाहीत, त्यामुळे शेतात शोधाशोध सुरू करण्यात आली. गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात अनिकेत प्लास्टिकच्या गोणीत पडलेला आढळून आला. तर त्यापुढे काही अंतरावर अंकितही शेतातच बसलेला दिसला. कुटुंबियांनी त्या दोघांची तातडीने सुटका करून जवळ घेतले. इतका वेळ कुठे होतात, इथे कसे आलात अशी प्रेमाने त्यांची विचारपूस केल्यावर त्या मुलांनी सगळं खरं सांगितलं.

त्याच गावातील रहिवासी राकेश आणि त्यांचा मुलगा नरवीर उर्फ ​​बडके याच दोघांनी त्यांना बाईकवरून शेतात आणलं, असं मुलांनी सांगितलं. त्यानंतर गावकऱ्यांनी राकेशला गावातून पकडून आणिले आणि पोलिसांना कळवलं. या घटनेबद्दल समजताच पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी आरोपी नरवीरला दुसऱ्या गावातून अटक केली. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अनिकेतचे वडील अवनीश यांनी सांगितले की, आरोपी वडील आणि मुलगा दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्या मुलांना विकण्यासाठीच त्यांचे अपहरण करून शेतात ठेवण्यात आले होते. राकेश आणि नरवीर हे दोघे रात्री अंधाराचा फायदा घेऊन मुलांना घेऊन गावाबाहेर पळून जाणार होते. मात्र सुदैवाने त्यापूर्वीच त्यांचा डाव उघडकीस आला. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.