आई आणि मुलगी – दोघींचा एकच बॉयफ्रेंड ; लग्नाची वेळ आल्यावर मात्र…

आरोपीचे अल्पवयीन मुलगी आणि तिची आई या दोघांशीही प्रेमसंबंध होते. मात्र त्या मुलीला त्याच्याशी लग्न करायचे. याच मुद्यावरून दोघांमध्ये सारख वाद व्हायचे. एक दिवस या वादाचा शेवट अतिशय हिंसक आणि दु:खद झाला.

आई आणि मुलगी - दोघींचा एकच बॉयफ्रेंड ; लग्नाची वेळ आल्यावर मात्र...
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 4:25 PM

लखनऊ | 4 ऑक्टोबर 2023 : एकीकडे आईला फिरवत होता, तर दुसरीकडे तिच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशीही प्रेमाचं नाटक करत होता. मात्र लग्नाची वेळ आल्यावर मात्र तो घाबरला आणि त्याच नादात नको ते करून बसला. एका तरूणाच्या निर्घृण कृत्याची ही कहाणी सगळ्यांनाच हादरवून सोडेल. अतिशय दु:खद अशा या घटनेने सर्वच हादरले. असं काही होऊ शकेल, असा कोणीच स्वप्नातही विचार केला नव्हता.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे एक अल्पवयीन मुलीशी आणि तिची आई या दोघींशीही प्रेमसंबंध होते. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पण प्रियकराने लग्नास नकार दिला. मात्र मुलगी लग्नाच्या मागणीवर ठाम राहिल्याने तो चिडला आणि त्याने तिचा जीवच घेण्याचा कट रचला. त्यानंतर संधी मिळताच त्याने तिचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या आहे हे लपवण्यासाठी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. जेणेकरून हे आत्महत्येचे प्रकरण आहे, अशी लोकांची समजूत पटेल. पण ती हत्याच असल्याचे अखेर समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

गोरखपूरमध्ये गेल्या महिन्यात 26 सप्टेंबरला ही घटना घडली. कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पण त्या रिपोर्टमध्ये जी माहिती समोर आली त्यामुळे सगळेच हादरले. त्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा गळा दाबून खून झाला, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्प्ट झाले.

पीडित मुलीचे वडील मुंबईत राहतात. आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच, ते घरी परतले आणि त्यांनी एका व्यक्तीवर मुलीच्या हत्येचा आरोप करत त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतर पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुनील गौरला ताब्यात घेतले. या खून प्रकरणात सुनील आधीच संशयाच्या भोवऱ्यात होता. अखेर चौकशीत त्याने गुन्हा कबूल करत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.

आई-मुलगी दोघींशी होते प्रेमसंबंध

आरोपी तरुणाचे त्याच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या आईसोबतही अनैतिक संबंध होते, असे पोलिसांनी उघड केले. कामानिमित्त तोलगावी जायचा तेव्हा त्याची महिलेशी ओळख वाढली. त्यानंतर त्याने आई आणि मुलगी दोघींशी प्रेमप्रकरण सुरू केलं. ज्या दिवशी हत्या झाली, त्या वेळी मुलीची आई बाहेर गेली होती. हीच संधी साधून आरोपी घरी आला. तेव्हा अल्पवयीन मुलीने त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने त्याच्या एका मित्राची मदत घेतली. दोघांनी तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. लोकांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सगळा खुलासा झाल्याने त्यांचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.