रील्सचा नाद नडला, धडाडत्या रेल्वेसमोर उभा राहून कॅमेरा हातात धरला आणि दुसऱ्या क्षणी…

या घटनेची हृदयाचा थरकाप उडवणारी दृश्य समोर आली आहेत. घटनास्थळावरील दृश्य पाहून सर्वच हादरले. काही क्षणांच्या मजेसाठी आणि लाइक्ससाठी तरूणाने हे पाऊल उचचलं खरं पण त्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं.

रील्सचा नाद नडला, धडाडत्या रेल्वेसमोर उभा राहून कॅमेरा हातात धरला आणि दुसऱ्या क्षणी...
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 1:02 PM

लखनऊ | 30 सप्टेंबर 2023 : हातात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियावर अकाऊंट… काहीशे फॉलोअर्स, हे सगळं आलं की लोकांना वाटू लागतं की अपुनही भगवान है ! सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात आणि लाईक्सच्या मोहात लोकं तहानभूक हरवून बसतात. अगदी काहीही करायला तयार असतात. अशाच नादात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली असून रील्स बनवण्याच्या नादात तरूणाचं आयुष्यंच संपून गेलं.

रीलच्या वेडामुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना भारतात घडली आहे. उत्तर प्रदेशात एक अल्पवयीन मुलगा रेल्वे रुळांवर बेजबाबदारपणे उभा राहून रील बनवत होता. मात्र तेव्ढ्यात मागून वेगाने आलेल्या ट्रेनची त्याला धडक बसली आणि तो दूर फेकला गेला. या भयंकर दृश्याची धक्कादायक व्हिज्युअल्सही समोर आली आहेत. फहमान असे मृताचे नाव असून तो अवघ्या 14 वर्षांचा होता. अवघ्या काही लाईक्ससाठी त्याने त्याचं लाखमोलाचं आयुष्य गमावलं.

रेल्वे रुळावरील व्हिडीओ झाला रेकॉर्ड

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे ही दुर्दैवी घटना घडली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. लाल रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेला फहमान हा रुळाच्या दिशेने चालत जाऊन पुढे उभा राहिला. दुसरा माणूस त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मागून ट्रेन येत होती तरी फहमान रुळाजवळून हलला नाही. वेगाने आलेल्या ट्रेनची फहमानला जोरात धडक बसली. ही टक्कर एवढी भीषण होती की फहमान हवेत उंच उडून अनेक फूट दूर फेकला गेला. क्षणात खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हे पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणारा त्याचा मित्रही हादरलाच.

या घटनेतील मृत फहमान हा उत्तर प्रदेशातील जहांगिरबादमधील तेरा दौलतपूर येथे राहणारा असून मुन्ना असे त्याच्या वडिलांचा नाव आहे. फहमान हा त्याचे मित्र शोएब, नादीर आणि समीर यांच्यासोबत एक मिरवणूक पहायला जात होता. मात्र रील्स बनवण्याच्या मोहापायी तो रेल्वे रुळाजवळ जाऊन उभा राहिला आणि गाडीची धडक बसून अपघात झाला.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनची धडक बसून कित्येक फूट दूर उडून खाली कोसळलेला फहमान हा जागीच ठार झाला. या दुर्दैवी आणि तितक्याच दुःखद घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.