चोर सोडून संन्याशाला फाशी… एक सारख्या नावामुळे पोलिसांनी केली नको ती घोडचूक

आपण निर्दोष असल्याचे पीडित इसम वारंवार पोलिसांना सांगत होता, पण पोलिस त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हते. पोलिसांनी आपले काहीच ऐकले नाही आणि तुरुंगात पाठवल्याचा आरोप करत पीडित इसमाने पोलिस आयुक्तांकडे न्यायाची मागणी केली आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी... एक सारख्या नावामुळे पोलिसांनी केली नको ती घोडचूक
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 2:23 PM

कानपूर | 23 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशच्या कानपूर (uttar pradesh) पोलिसांचा अजब कारभार सध्या चर्चेत आला आहे. आरोपी न सापडल्याने त्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीला 10 दिवसांसाठी जेलमध्ये पाठवण्याची अजब कामगिरी पोलिसांनी केली आहे. आपलं ओळखपत्र दाखवत, तो माणूस आपण निर्दोष असल्याचं पोलिसांना बजावत होता पण पोलिसांनी त्याचं काहीएक ऐकलं नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तो त्याच्या पत्नीचा छळ करत होता.

गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्याच्या सरकारच्या आदेशामुळे कानपूर पोलिसांवर मोठा दबाव असल्याचं दिसत आहे. कॉलम पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारांची ओळख न पटवता पोलिस निरपराधांनाच तुरुंगात पाठवत आहेत. घाटमपूर कोतवाली पोलिसांनीही असेच काहीस करत मोठी चूक केली.

चोर सोडून संन्याशाला फाशी

2021 मध्ये कुष्मांडा नगर येथील रहिवासी प्रमोद कुमार याला पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याखाली तुरुंगात पाठवले होते. जामीनावर सुटल्यानंतर प्रमोदकुमार संखवार हा आरोपी या खटल्यात समन्स बजावूनही न्यायालयात हजर होत नव्हता. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाने 24 ऑगस्ट 2023 रोजी प्रमोद कुमार (संखवार) विरुद्ध NBW (non-bailable warrant) जारी केले. त्यानंतर 12 सप्टेंबर 2023 रोजी इन्स्पेक्टर शुभम सिंह आणि हेड कॉन्स्टेबल राज किशोर यांनी प्रमोद कुमार संखवार याच्या जागी प्रमोद कुमार (साहू) याला पकडले. आणइ त्याला वॉरंटी देऊन तुरुंगात पाठवले. प्रमोद साहू हा बसंत विहार घाटमपूर येथील रहिवासी असून त्याच्या भावाचासह काम करतो.

तुम्ही समजता तो मी नाही

22 सप्टेंबर रोजी प्रमोद कुमार साहू याची जामीनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर प्रमोद कुमार साहू याने कमिश्नरकडे जाऊन तक्रार नोंदवली. अटक करून पोलिस त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले. तुझं नाव प्रमोद कुमार आहे, तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पत्नीला मारहाण केल्याचा आरोपही तुझ्यावर आहे. हे सगळं ऐकल्यावर मी ती व्यक्ती नाही, हे मी पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. माझे वडील जिवंत आहेत , माझी बायको माहेरी गेली आहे, याचे सगळे पुरावे मी त्यांना दिले. मी कधीच जेलमध्ये गेलो नाही, हे पटवून देण्याचाही मी खूप प्रयत्न केला, पण पोलिसांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि मला तुरूंगात पाठवलं, असं फिर्यादीने नमूद केलं.

चौकशीचे आदेश

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे कानपूरचे सह पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.