प्रसिद्ध स्टॉलवर जाऊन कबाब खाल्ले, मग चव चांगली नाही म्हणत जे केले त्याने एकच खळबळ उडाली !

दोघेजण आलिशान गाडीतून प्रसिद्ध कबाब स्टॉलवर कबाब खाण्यासाठी आले. दोघांनी कबाब खाल्ले, मग चव चांगली नाही म्हणत मालकाशी वाद घालून निघून जाऊन लागले. स्टॉलचा आचारी बिलाचे पैसे मागायला गेला अन् भलतेच झाले.

प्रसिद्ध स्टॉलवर जाऊन कबाब खाल्ले, मग चव चांगली नाही म्हणत जे केले त्याने एकच खळबळ उडाली !
कबाब आवडले नाही म्हणून शेफला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 10:30 PM

बरेली : कबाबची चव आवडली नाही दोन मद्यधुंद तरुणांनी आचाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बरेलीत घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. बरेली शहरातील प्रेम नगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नसीर अहमद असे हत्या करण्यात आलेल्या आचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दुकानातील अन्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस गाडीच्या नंबरच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

कबाबची चव आवडली नाही म्हणून दुकानमालकाला मारले

प्रेम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रियदर्शनी नगरमध्ये जुने कबाबचे दुकान आहे. बुधवारी रात्री उशिरा एका लक्झरी कारमधून दोन तरुण आले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. दोघांनी दुकानात कबाब खाल्ले. कबाब खाल्ल्यानंतर दोघांनी दुकानाचे मालक अंकुर सबरवाल यांच्याकडे कबाबची चव चांगली नसल्याची तक्रार केली.

बिलाचे पैसे आणायला गेलेल्या आचाऱ्यावर गोळी झाडली

वाद वाढत गेल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांनी सबरवाल यांना मारहाण केली. यानंतर दोघेही आपल्या गाडीत जाऊन बसले. सबरवाल यांनी कबाब बनवणाऱ्या कुक नसीर अहमदला बिलाचे 120 रुपये घेण्यासाठी आरोपींकडे पाठवले. पैसे मागताच गाडीतील दोघांनी अहमदला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

गाडीच्या नंबरवरुन आरोपी उत्तराखंडचे असल्याचे निष्पन्न

यादरम्यान एका तरुणाने अहमद याच्यावर गोळी झाडली. यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी कारसह पळून गेले. मात्र घटनेदरम्यान दुकानातील इतर कामगारांनी कारचा फोटो क्लिक केला होता. पोलिसांनी गाडीच्या क्रमांकाच्या आधारे तपासणी केली असता, गाडी उत्तराखंडमधील काशीपूर येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.