एका नकाराने आयुष्यच बदललं, गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवरच केला वार

| Updated on: Sep 26, 2023 | 4:09 PM

पीडित तरूणाचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मैत्रीणीशी ओळख करू देण्यासाठी तिने त्याला घरी बोलावले. ती मैत्रीण त्याच्याशी लगट करू लागली. आणि अचानक.. वातावरणात एकच किंकाळी घुमली.

एका नकाराने आयुष्यच बदललं, गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवरच केला वार
Follow us on

कानपूर | 26 सप्टेंबर 2023 : बहुतेक लोकांना नकार पचवता येत नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला नकार दिला, किंवा काम करण्यास नाही म्हटलं तर बरेचसे लोक ते त्यांच्या इगोवर (ego) घेतात. त्यांचा अहंकार दुखावतो, त्यामुळे नकार देणारा माणूस आपला अपमान करायलाच बसलाय, अशा रितीने ते तो अर्थ कढतात. आणि माणसाचा अहंकार दुखावला तर रागाच्या भरात तो काहीही करू शकतो. राग हा तर सर्वात मोठा शत्रूच की.

असाच एक नकार देणं एक तरूणाला भलंतच महागात पडलं. कारण त्याच्या नकारानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्टच (cut private part) कापून टाकला. वाचून धक्का बसला ना ? पण तिने असं का केलं, हे वाचलंत तर आणखीनच मोठा धक्का बसेल. त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला एवढ्यासाठीच केला कारण त्याने शारिरीक संबंध (refused to have physical relation) ठेवण्यास नकार दिला होता. ते देखील तिच्याशी नव्हे तर तिच्या मैत्रिणीशी…. सगळं वाचूनच गरगरायला लागलं असेल ना ?

नक्की काय आहे हे प्रकरण ?

कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तेथील चौबेपुर गावाता राहणाऱ्या एका तरूणाचे त्याच गावातील एका विवाहीत महिलेशी प्रेमसंबंध होते. आपल्या मैत्रिणीची ओळख करून देण्याच्या निमित्ताने त्या (विवाहीत) महिलेने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले. त्या मैत्रीणीने त्याच्यासोबत लगट करण्यास सुरूवात केली. तिला त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायची इच्छा होती, ती त्याला तशी जबरदस्ती देखील करू लागली. मात्र त्या तरूणाला हे बिलकूल आवडले नाही आणि त्याने शारिरीक संबंध ठेवण्यास थेट नकार दिला. मात्र हे ऐकून त्या महिलेला त्याचा प्रचंड राग आला आणि संतापाच्या भरातच तिने त्याच्यावर वार करत त्याच प्रायव्हेट पार्टच कापला. वातावरणात एकच किंकाळी घुमली.  त्या तरूणाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.

कसाबसा पोहोचला घरी

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणाने तेथून लगेच पळ काढला आणि तो कसाबसा अडखळत, चालत घरी पोहोचला. त्याची ही अवस्था पाहून घरातले सगळे लोक हादरलेच. मात्र त्यांनी वेळ न दवडता, त्याला लगेचच कानपूरमधील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलीसांनी सांगितले.