दुकान बंद झालं, आता सिगरेट मिळणार नाही; एवढ्याशा मुद्यावरून भांड भांड भांडला आणि थेट गोळीच…
रात्री उशीर झाला असून मी आता दुकान बंद केलं आहे. त्यामुळे आता परत दुकान उघडून सिगारेट देणं शक्यन नाही असे सांगत दुकानदाराने सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे तो तरूण संतापला आणि शिवीगाळ करू लागला.
लखनऊ| 5 ऑक्टोबर 2023 : एका तरुणाला सिगारेट देण्यास नकार देणे दुकानदाराला चांगलेच महागात पडले. सिगारेट न मिळाल्याने या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून दुकानदारावर जीवघेणा हल्ला (attack) केला. यामध्ये त्या इसमाचा पाय गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील मौ आयमा पोलीस स्टेशन हद्दीतील मेहरोंडा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात मकबूल अहमद नावाच्या व्यक्तीचे किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री उशीराच्या सुमारास अंकुश पटेल नावाचा गावातील एक तरूण त्यांच्या दुकानावर आला. अंकुशने त्यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. मात्र रात्री उशीर झाला असून मी आता दुकान बंद केलं आहे. त्यामुळे आता परत दुकान उघडून सिगारेट देणं शक्यन नाही असे सांगत मकबूल यांनी त्याला नकार दिला. याच मुद्यावरून अंकुश आणि मकबूल यांच्यामध्ये वाद सुरू झाला.
सिगारेटवरून पेटला वाद
हा वाद एवढा वाढला की अंकुशने मकबूल यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांचा वाद वाढल्यानंतर मकबूल यांचा पुतण्या, राजूहू बाहेर आला. त्यानंतर राजू आणि अंकुशमध्ये वाद सुरू झाला. रागावलेला अंकुश तिथून निघून गेला. पण थोड्याच वेळात तो घरातून लायसन्स असलेली बंदूक घेऊन आणि सरळ दुकानदार मकबूलच्या घरातच घुसला.
थेट गोळीच झाडली
संतापलेल्या अंकुशने मकबूलवर पिस्तुलीतून गोळीबार केला. त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाली. हे पाहून मकबूलने मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना हाक मारली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोळीबाराबद्दल कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अंकुशला ताब्यात घेतले. त्याला अटक करून ते तिथून निघून गेले. ली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.