Video : काल एसटी पुलावरुन कोसळली, आज स्कूल बस पुरात उलटली! मध्य प्रदेशनंतर उत्तराखंडमध्ये अपघात
Uttarakhand Bus Video : नशीबानं यावेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता
मुसळधार पाऊस. नदीला पूर. पुराच्या पाण्यात (Flood water) स्कूल बस आली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला संरक्षक कठडे नव्हते. पाण्याचा प्रवाह अफाट. बस रस्त्यावर येऊन थांबली. पुढे नेण्याची हिंमत चालकाला झाली नाही. ज्याची भीती होती तेच घडलं. पुराच्या पाण्याने अख्खी बस रस्त्यावरीन पुराच्या पाण्यातून ओढून नेली आणि अखेर ती नदीत कोसळली. ही थरारक घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile video) कैद केलीय. या अंगावर काटा आणाणाऱ्या घटनेनं पुराच्या पाण्यात गाडी घालणं जीवावर बेतू शकतं, हे पुन्हा अधोरेखित झालंय. उत्तराखंडच्या (Uttarakhand Bus Video) अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केलाय. त्याच दरम्यान, उत्तराखंडच्या चंपावत इथे ही बस पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. याचा लाईव्ह व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झालाय.
नेमकी कुठे घडली घटना?
ही घटना टनकपूरच्या किरोडा बरसाती नाल्यावर घडली. स्थानिकांच्या मदतीने सुदैवानं बसच्या चालकानाला आणि त्याच्या मदतनीसाला लोकांनी कसबसं बाहेर काढलं. त्यामुळे ते दोघंही बालंबाल बचावले आहेत. पण पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर आपलं काय घोडचूक केली, याची जाणीव त्यांना झाली. नशीबानं यावेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
या घटनेनंतर प्रशासनाला कळवण्यात आलं. प्रशाकीय यंत्रणेनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने पुराच्या पाण्यात पलटी झालेल्या बसलाही बाहेर काढलंय. यात बसचं मोठं नुकसान झालंय.
पाहा व्हिडीओ :
उत्तराखंड के चंपावत में बह गई स्कूल बस pic.twitter.com/hS8pHtBgNq
— अजीत तिवारी (@ajittiwari24) July 19, 2022
ज्या बरसाती नाला याठिकाणी ही बस उलटली तिथं याआधीही अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटने घडलेल्या आहेत. अनेक वर्ष या ठिकाणी पूल व्हावा, अशी मागणी केली जातेय. मात्र अजूनही या ठिकाणी पूल न झाल्याकारणने पुराचं पाणी रस्त्यावर येतं. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका शक्तिशाली असतो, की तो स्कूल बससारख्या अवजड वाहनांनाही सहज कवेत घेतो, हे समोर आलेल्या व्हिडीओतूनही अधोरेखित झालंय.
पाहा राजकारणातली मोठी बातमी : रामदास कदम रडले
काल मध्य प्रदेशात भीषण अपघात
दरम्यान, नुकताच मध्य प्रदेशात झालेल्या एसटी अपघातात 13 जण ठार झाले होते. मध्य प्रदेशच्या धारमध्ये इंदौर-अंमळनेर एसटी बस ही पुलावर थेट नदीत कोसळली होती. यामध्ये 13 प्रवासांचा मृत्यू झाला होता. नदीवरुन कोसळून झालेल्या बस अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्ये स्कूल बस