माणुसकीला काळीमा फासणारी घटना, नववधूला लग्नानंतर पाचव्या दिवशी सर्वांसमोर व्हायला लावलं विवस्त्र, कारण ऐकून बसेल धक्का!
लग्नानंतर सासरच्या लोकांनी सुनेचा छळ केल्याच्या घटना कानावर पडतात. मात्र लग्न होऊन आठवडाही झाला नव्हता अन सासरच्यांनी तिच्यासोबत केलं अत्यंत अंगावर काटा आणणारं कृत्य!
Crime : लग्नानंतर सासरच्या लोकांनी सुनेचा छळ केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्याच असतील. तर आताही एक अशीच घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल. उत्तर प्रदेशमधील एका नवीन नवरीला लग्नानंतर पाच दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिला कपडे काढण्यास भाग पाडलं आहे. पण त्यांनी नववधूसोबत हा गैरप्रकार नक्की का केला? याचं कारण ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल.
उत्तर प्रदेशमधील ताजनगरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका नववधूवर तिच्या सासरच्यांनी अनेक आरोप लावले आहेत. तसंच तिला अवमानित करून घराच्या बाहेर काढलं आहे. त्यावेळी तिचा मोठ्या प्रमाणात त्यांनी छळ देखील केला आहे. आता ही नववधू तिच्या माहेरी राहत आहे असून ती सासरच्यांनी केलेल्या आरोपांनंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी न्याय मिळवत आहे.
या नववधूवर लग्नाच्या पाच दिवसानंतर तिच्या सासरच्यांनी ती किन्नर असल्याचा आरोप तिच्यावर लावला आहे. तसंच त्या गावातील महिलांनी तिचे कपडे उतरवून ती किन्नर असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर तिला घराबाहेर काढल्यामुळे सध्या ही नववधू तिच्या माहेरी राहत आहे. तसंच या नववधूनं सांगितलं की, लग्नात सासरच्यांना हुंडा न दिल्यामुळे त्यांनी तिच्यावर हा गंभीर आरोप लावला असून तिला घराबाहेर काढलं आहे.
ही नववधू फतेहाबाद येथील कोटरा गावातील असून तिचं लग्न 20 मे या दिवशी इरादतनगर या गावातील तरुणाशी झालं होतं. तसंच पीडितेनं आरोप केला आहे की, तिच्या हातावरची मेहंदी सुद्धा गेली नव्हती तोपर्यंत तिच्या सासरच्यांनी तिच्याकडे हुंड्याची मागणी केली. तसंच लग्नानंतर पाच दिवसांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिच्या सासरच्यांनी ती किन्नर असल्याचा आरोप केला आणि तिला घराबाहेर काढले.
धक्कादायक बाब म्हणजे या नव वधूच्या सासरच्या महिलांनी तिचे कपडे उतरवले आणि त्यानंतर ती किन्नर असल्याचं सांगितलं. तर नववधूनं सांगितलं की, तिला आणि तिच्या घरच्यांना सासरच्यांनी जिवे मारण्याची धमकी देखील दिली. तसंच तिला किन्नरांकडे सोपवण्याची देखील धमकी त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज या पिढीत तरुणीने अतिरिक्त पोलीस आयुक्त केशव चौधरी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. तसंच पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत पीडित तरुणीच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.