अज्ञातांकडून पुन्हा वाहनांची तोडफोड, मध्यरात्री घडलेल्या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण

कल्याणमध्ये गुन्हेगारी सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. पुन्हा वाहनतोडीचे सत्र सुरु झाल्याने, गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते.

अज्ञातांकडून पुन्हा वाहनांची तोडफोड, मध्यरात्री घडलेल्या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याणमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 6:42 AM

कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा वाहन तोडफोडीचे सत्र सुरु झाले आहे. काल मध्यरात्री कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात एका अज्ञातांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या 3 ते 4 रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणामुळे वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. संबंधित आरोपीला लवकरात लवकर पोलिसांनी पकडून कठोर कारवाई करावी, त्याचप्रमाणे पोलिसांनी रात्रीच्या वेळेला ग्रस्त वाढवावी, अशी मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे.

रिक्षा फोडताना आरोपी सीसीटीव्हीत कैद

या सीसीटीव्ही दिसणारा व्यक्ती आधी आपल्या हाताने रिक्षाची काच फोडण्याचा प्रयत्न करतो. मात्र हाताला मार लागल्यानंतर तो संतापतो. मग रस्त्यावरील दगड हातात घेऊन आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व रिक्षांच्या काचा फोडत तो निघतो. मात्र या घटनेमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोकीसानी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

पुण्यातही तोडफोड सत्र सुरु

पुण्यातही टोळक्यांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड सत्र सुरु करण्यात आले होते. येरवड्यात गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली होती. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हातात कोयते घेऊन दहशत माजवून 6 ते 7 गाड्यांची तोडफोड केली. पूर्व वैमनस्यातून गाड्यांची तोडफोड केल्याचे तपासात समोर आलं होतं.

हे सुद्धा वाचा

तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी सुभाष राठोड, अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांची चव्हाण गँगने हत्या केली होती. त्यातील तीन आरोपीची नुकतीच जामीनावर सुटका झाली होती. त्या रागातून हत्या झालेल्या राठोड गटातील तरुणांनी दहशत माजवण्यासाठी गाड्या फोडल्या होत्या. यामध्ये चार चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी या गाड्यांचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.