Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्याला अखेर अटक, एक महिनाआधीच…

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भररस्त्यात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून झाला. या हत्येने राज्यात मोठी खळबळ माजली. हत्येसाठी पिस्तुल पुरवणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे.

Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्याला अखेर अटक, एक महिनाआधीच...
वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 8:33 AM

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भररस्त्यात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून झाला. या हत्येने पुण्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. नाना पेठेत हा खून झाला होती. याप्रकरणी पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे. दरम्यान या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी जे शस्त्र वापरले, ते पिस्तुल पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमधून विकत घेतलं पिस्तूल

मध्य प्रदेशमधून हे पिस्तूल खरेदी करण्यात आलं होतं, असं पोलीस चौकशीत उघड झालं आहे. 50 ते 60 हजार रुपयांमध्ये पिस्तुल खरेदी करण्यासाठी 4 जण ममध्य प्रदेशमध्ये गेले होते. वनराज आंदेकर यांच्या खुनापूर्वी दीड महीना आधीच हे पिस्तुल आणून ठेवलं होतं, अशी माहितीदेखील समोर आली आहे. याप्रकरण आत्तापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांचा खून आंदेकर टोळीचा बॅक बोन म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून वनराज आंदेकरांचा खुनाचा कट रचण्यात येत होता. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा प्लॅन सोमनाथ गायकवाड यांनी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे घरगुती वाद आणि टोळी युद्ध यामुळेच वनराज आंदेकरचा खून झाल्याचे समजते.

घरगुती वादातून घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास ही हत्या झाली. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये 13 हल्लेखोर दिसत आहेत, ज्यांनी एकत्र येऊन आंदेकर यांना गोळ्या घातल्या.तसेच त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा पोलिसांना संशय आहे, कारण हल्ला करण्यापूर्वी त्या परिसरातील वीजही घालवण्यात आली होती. वनराज यांच्यावर बेछूट गोळीबार करून, त्यांचा खून केल्यावर सर्व हल्लेखोर पटापट बाईक्सवर बसून तेथून फरार झाले. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून प्रथम तीन संशियाताना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांसह 21 जणांना अटक केली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.