आई नव्हे ही तर… दोन लहानग्यांवर आईचाच अत्याचार, चाकूने प्रायव्हेट पार्टवर चटकेही…
एका महिलेने तिच्या लहानग्या मुलांवरच अत्याचार केल्याचं समोर आल आहे. लहान मुलांना लाटण्याने मारहाण केली एवढंच नव्हे तर अवघ्या 7 वर्षांच्या मुलाच्या गुप्तांगावर चाकूने चटकेही दिल्याचे खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
राज्यभरात लहानग्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत आहे. मात्र या भयानक कृत्यांची माहिती ऐकून अंगावर अक्षरश:काटा येतो. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातील वातावरण तापले असून आज मविआच्या वतीने निषेध आंदोलन देखील करण्यात येत आहे. या घटनेची तीव्रता अद्याप कायम असतानाच आता वसईत चिमुकल्यांसोबत घडलेली आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका महिलेने तिच्या लहानग्या मुलांवरच अत्याचार केल्याचं समोर आल आहे. लहान मुलांना लाटण्याने मारहाण केली एवढंच नव्हे तर अवघ्या 7 वर्षांच्या मुलाच्या गुप्तांगावर चाकूने चटकेही दिल्याचे खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
ही महिला त्या मुलांची सावत्र आई असून तिने त्यांचा अनन्वित छळ केला. मात्र त्या मुलांच्या वडिलांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी लगेच पोलिसांत धाव घेतली आणि आपल्या क्रूर पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, वसईमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून साव्तर आईने घरातील दोन अल्पवयीन मुलांवर बरेच अत्याचार केले. घरातील भांडी घासणे, फरशी पुसणे, झाडू मारणे अशी कामं ती त्यांच्याकडून करून घ्यायची. आणि त्यासाठी ती त्या लहानग्या मुलांना लोखंडी पकडीने, पोळी लाटण्याच्या लाटण्याने मारहाण करायची. एवढेच नव्हे तर तिने एका 7 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटकेही दिले. अखेर त्यांच्या वडिलांसमोर सावत्र आईची क्रूर वागणूक उघड झाली. त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. शाळाच नव्हे तर राहत्या घरातही मुलं हे असुरक्षित असल्याचे वसईच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
चौपाटीवर गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करणाऱ्याला 12 तासांत अटक
चौपाटीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला १२ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आरोपी 21 वर्षांचा असून तक्रारदार अल्पवयीन मुलीचा त्याने विनयभंग केला होता. या घटनेनंतर मुलगी घाबरली होती. तिने नुकतीच जुहू पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) बुधवारी रात्री गुन्हा दाखल होता.