वसई हत्या प्रकरणातील मुलीच्या हत्येमागचं खरं कारण अखेर समोर, कुटुंबियांकडून फाशीची मागणी
Vasai Murder case : वसई हत्या प्रकरणामध्ये आरोपी रोहित यादव याने का हत्या केली? यामागचं कारण समोर आलेलं आहे. दोघांची आधीपासूनच ओळख होती, लग्नापर्यंत गोष्टी गेल्या होत्या पण असं काय झालं की रोहितने आरतीला संपवण्याचं ठरवलं.
वसईमध्ये मंगळवारी सकाळी आरती यादव या तरूणीची तिच्याच प्रियकराने हत्या केली. या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. आरोपी रोहित यादव याने क्रूरपणे नटबोल्टच्या पान्याने आरतीच्या डोक्यावर जिव्हारी घाव टाकत जागेवरच संपवलं. या हत्येमागे सुरूवातीला आरतीचे दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत संबंध असल्याच्या संशयातून हत्या झाल्याचं समोर आलं होतं. आरती आणि रोहित यांच्या लग्नाची बोलणी दोघांच्याही घरी झाली होती. मात्र ही हत्या दोघांच्या लग्नावरून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
आरती यादव आणि रोहित यादव यांची ओळख नालासोपाऱ्यामध्येच झाली होती. दोघेही गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांसोबत मैत्रीच्या स्वरूपात राहत होते. दोघांच्या लग्नाला त्यांच्या घरून होकार देण्यात आला होता. पण आरतीच्या घरच्यांनी एक अट घातली होती ती म्हणजे रोहितने स्वत:च घर घ्यायला हवं. पण रोहितला जॉब नसल्याने त्याने असमर्थता दर्शवली. त्यानंतर रोहितने आरतीला सांगितलं की त्याची वहिनी त्याच्यासाठी मुलगी शोधत आहे. यावर आरती म्हणाली की ठीक आहे तु कर मग लग्न मी नाही मध्ये पडणार, त्यानंतर एक दिवस आरती फोनवर बोलत होती तेव्हा रोहितने तिचा मोबाईल घेतला आणि फोडून टाकत मारण्याची धमकी दिली.
शनिवारी 8 जूनला आरतीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. आणि रोहितकडून पैसे घेवून त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहिण सानिया हिने केला. त्यानंतर मंगळवारी त्याने आरती सकाळी कामावर निघाली असताना तिची हत्या केली. आरोपी रोहित यादव हिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आरतीच्या आई-वडिलांनी केली आहे.
दरम्यान, आरतीवर मंगळवारी रात्री आचोळे स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज वसईत येऊन मयत आरतीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तर पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी मयत आरती यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
मृतक आरतीचे वडील रामदुलारे हे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचे, तर आई निर्जलादेवी ही घरीच असायची. आरतीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. बहिण सानिया (वय 16), भाउ अंकित (वय 12), लहान बहिण आचल (वय 11) असं तिच कुटुंब घरची परिस्थिती हालाखीची असल्याने तिने दहावी नंतर खाजगी कंपनीत नोकरी करत होती.