तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

सावधान... सुकलेल्या कुजलेल्या भाज्याही तुम्हाला ताज्या असल्याचं भासवून विकल्या जात आहेत. त्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!
केमिकलचा वापर करुन भाज्या ताज्या करणारा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 9:01 PM

अंबरनाथ : तुम्ही भाज्या खरेदी करण्यासाठी बाजारात जाता. ताज्या, चांगल्या आणि आरोग्यदायी भाज्यांसाठी तुम्ही जास्तीचे पैसे मोजायलाही तयार असता. मात्र, सावधान… सुकलेल्या कुजलेल्या भाज्याही तुम्हाला ताज्या असल्याचं भासवून विकल्या जात आहेत. त्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पूर्णपणे सुकलेल्या भाज्या हिरव्यागार आणि टवटवीत करणारं एक केमिकल वापरलं जात आहे. त्याद्वारे सुकलेल्या भाज्याही ताज्या असल्याचं भासवून तुम्हाला विकल्या जात आहेत. (Dried vegetables fresh by chemical, The Viral video warns the common man)

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे नक्की सांगता येत नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बाजारात गेल्यानंतर हिरव्यागार आणि टवटवीत पालेभाज्या पाहून त्या विकत घेण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश असावा, असं डॉक्टर देखील सांगतात. मात्र आपण घरी आलेल्या पालेभाज्या या हिरव्यागार आणि टवटवीत कशा होतात? याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अगदी सुकलेल्या अवस्थेतील भाज्यांना अवघ्या दोनच मिनिटात टवटवीत करणारं एक रसायन सध्या बाजारात उपलब्ध झालंय.

सुकलेल्या भाज्या 2 मिनिटांत टवटवीत!

या रसायनात भाज्या बुडवल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटात अगदी टवटवीत दिसू लागतात. याचं प्रात्यक्षिक असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या व्यक्ती या मराठीत बोलत असल्याने हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. व्हिडिओमध्ये असलेल्या व्यक्तींनी सुकलेल्या भाज्या हिरव्यागार करण्याचं जे प्रात्यक्षिक दाखवलंय, ते खरोखरच धक्कादायक आहे.

अगदी सुकलेल्या अवस्थेतील या तीन प्रकारच्या भाज्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका कोथिंबिरीची जुडी या व्यक्तींनी आधी साध्य पाण्यात बुडवून बाजूला ठेवली. पाण्यात बुडवलेल्या कोथिंबिरीच्या जूडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. त्यानंतर एका भांड्यात असलेल्या रसायनामध्ये कोथिंबीर आणि दुसरी एक पालेभाजी बुडवून ती देखील बाजूला ठेवली. यावेळी अवघ्या दोनच मिनिटात रसायनात बुडवलेल्या भाज्यांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली. दोनच मिनिटात या भाज्या अगदी ताज्या आणि टवटवीत भासू लागल्या. बाजूलाच पाण्यात बुडवून ठेवलेली कोथिंबिरीची जुडी मात्र जशीच्या तशीच होती. यानंतर ती जुडी देखील या व्यक्तींनी याच केमिकलमध्ये बुडवली आणि त्या कोथींबीरीच्या जुडीतही लक्षणीय बदल झाला. सुकलेली आणि अक्षरशः काळी पडलेली कोथिंबीरीची जुडी काही मिनिटातच हिरवीगार आणि टवटवीत झाली.

व्हिडिओत दाखवण्यात आलेलं केमिकल आहे की एखादं औषध, हे जरी स्पष्ट झालेलं नसलं, तरी ते नागरिकांच्या आरोग्याला हानीकारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण बाजारातून आणलेली हिरवी भाजी ही नक्की शेतात पिकली आहे? की एखाद्या केमिकलच्या पातेल्यात हे तपासून घेणं गरजेचं बनलं आहे.

इतर बातम्या :

Raj Kundra case : राज कुंद्रांच्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट! आकडेवारी जाणून तुम्हीही हैराण व्हाल

Benefits Of Grapeseed Oil : त्वचा उजळवायचीय?, मग द्राक्षांच्या बियांचं तेल वापराच!

Dried vegetables fresh by chemical, The Viral video warns the common man

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.