टिटवाळ्यात चोरीचा पॅटर्न पाहून तुम्हाला धक्काच बसेल, अशी माणसं दिसली तर सावधान, नाहीतर…
टिटवाळ्यात करप गावात झालेल्या चोरी प्रकरणानंतर चोरट्यांचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही अशी माणसे दिसली तर सावध रहा.
कल्याण / सुनील जाधव : कल्याणच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. वरप गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. हाफ पँट आणि तोंडाला मास्क लावून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हायरल होताच गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गावात झालेल्या एका चोरी प्रकरणाचा तपास करत असताना चोरटे कॅमेऱ्यात कैद झालेले दिसले. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
गावातील सीसीटीव्हीत चोरटे कैद
पाच दिवसांपूर्वी चोरट्यांनी या गावात राहणाऱ्या कोठेकर यांच्या घरात घुसून घरफोडी केली. धक्कादायक म्हणजे हे कुटुंब घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी उघडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील सोन्याचे दागिने लंपास चोरुन तेथून पोबारा केला. चोरीची घटना उघड होताच गावकरी आणि पोलिसांनी वरप गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाहिले.
टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सीसीटीव्हीत काही संशयित इसम कैद झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले हे सर्व रात्रीच्या वेळी हाफ पँट आणि मास्क घालून फिरत असलेले दिसत आहेत. या संशयित इसमांना पाहून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
डोक्यात हेल्मेट आणि अंगावर कोट घालून घरफोडी
याआधी डोक्यात हेल्मेट अंगावर कोट घालून घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगारांना डोंबिवलीतीव मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरी केल्यानंतर रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना बघून पळ काढत असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पाठला करून आरोपींना ताब्यात घेतले. तब्बल 36 गुन्हे दाखल असलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 21 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.