Virar Crime : विरारमध्ये पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, अनाधिकृत फेरीवाल्यांना लगाम कधी लागणार?

याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या हल्लेखोर फेरीवाल्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. पालिकेच्या प्रत्येक कारवाहित फेरीवाल्यांचे कर्मचारी यांच्यावरील हल्ले वाढत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाही करून त्यांना लगाम लावणे गरजेचे असल्याच्याही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Virar Crime : विरारमध्ये पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, अनाधिकृत फेरीवाल्यांना लगाम कधी लागणार?
विरारमध्ये पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्लाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 8:29 PM

विरार : विरारमधील अनाधिकृत अतिक्रमण (Unauthorized encroachment) हटवण्यासाठी पालिका प्रशासन सध्या एक्शन मोडमध्ये आले आहे. फरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेने मोहीत हाती घेतली आहेत. मात्र वसई-विरार (Vasai Virar Municipal Corporation), नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढतच चालली आहे. विरार पूर्व पालिका आणि स्टेशन परिसरात आज कारवाही सुरू असताना पालिकेच्या अतिक्रमण कारवाही पथकावर फेरीवाल्यांने हल्ला (Virar Crime) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी फेरीवाल्यांकडून पोलिका कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या हल्लेखोर फेरीवाल्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. पालिकेच्या प्रत्येक कारवाहित फेरीवाल्यांचे कर्मचारी यांच्यावरील हल्ले वाढत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाही करून त्यांना लगाम लावणे गरजेचे असल्याच्याही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

एकजण गंभीर जखमी

यात एक कर्मचारी जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. वसई विरार महापालिकेच्या प्रभाग सीच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी दीपक घोरकने असे त्यांचे नाव असून, फेरीवाल्यांच्या हल्ल्यात हे जखमी झाले आहेत. प्रभाग समिती सीचे सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी आज आपल्या पथकासह रस्त्यावरील फेरीवाले, बाजार यांच्यावर कारवाही सुरू केली होती. रस्त्यावरील अतिक्रमणे, फेरीवाले हटवत असताना अचानक एका फेरीवाल्याने हातात बांबू घेऊन, पालिकेच्या मजूर कर्मचारी यांच्यावर हल्ला करून, त्यांना बेदम मारहाण करीत जखमी केले आहे. यात एक कर्मचारी जखमी झाला आहे.

हल्ले होण्याची पहिली वेळ नाही

पालिकेच्या पथकावर हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही असे अनेक प्रकार घडले आहेत. नवी मुंबईतही काही महिन्यापूर्वी असाच प्रकार समोर आला होता, तसेच दादरमध्येही काही दिवसांपूर्वी असाच हल्ला झाला होता. त्यामुळे अतिक्रमण हटवणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता पालिका कर्मचारीही या प्रकाराविरोधात आक्रमक झाले आहेत. या हल्लेखोर फेरीवाल्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पाऊलं उचलण्यात यावीत. जेणेकरून भविष्यात असे हल्ला घडणार नाही, अशी मागणी आता पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

फेरीवाले विरुद्ध पालिका अधिकारी वाद कायमचा

गेल्या अनेक दिवसात असे प्रकार घडल्याने हा वाद आता नेहमीचा होऊन बसला आहे. अनाधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेची पथकं दाखल झाल्यावर अनेकदा स्थानिक फेरीवाले, तसेच इतर दुकानदार यांच्यातला वाद हा ठरलेला असतो, हे दुकानदार आणि फेरीवाले अनेकदा हे अतिक्रमण न हटवण्यावर ठाम असतात. तर पालिका प्रशासनाचा अतिक्रमण हटवण्यावर भर असतो. यातून अनेकदा शाब्दिक चकमिकीला सुरूवात होते. त्यानंतर हा वाद मारामारीपर्यंत पोहोचताना दिसतो. त्यातून असे हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या वादांवरही तोडगा काढण्यात यावा अशी मागणीही पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच अतिक्रमण हटवताना पुरेसे पोलीस संरक्षण असावे अशीही मागणी करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.