विरार : मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या ठिकाणी ऑटोरिक्षा चोरी, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या सराईत चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 लाख 18 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीवर ठाण्यात 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Virar Police Arrest gang of thieves)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या ठिकाणी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयासह ठाणे, मुंबई, रायगड परिसरातील विविध पोलीस ठाण्यात या चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. या टोळीने रस्त्यातील आटोरिक्षा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी यासारखे गुन्हे केले होते.
या गंभीर घटनाची पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी नोंद घेतली. यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरांच्या तपासासाठी तयार केले होते. विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने आपल्या गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला. या गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.
चेतन सुरेंद्र विश्वकर्मा (24), अभिजित प्रकाश हेजीब (19) असे अटक आरोपीचे नाव आहे. यातील चेतन हा विरार तर अभिजित हा डोंबिवलीचा राहणारा आहे. तर यांचे दोन साथीदार अल्पवयीन असून ते 17 वर्षांचे आहेत.
या टोळीने आतापर्यंत 10 जबरी चोरी, 9 रिक्षा चोरी केल्या आहेत. या आरोपीकडून 3 लाख 19 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. तसेच 6 लाख रुपये किंमतीच्या आटो रिक्षा असा एकूण 9 लाख 19 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीकडून आणखी मोठ्या गुन्ह्याची उकल ही होणार असल्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले आहे. (Virar Police Arrest gang of thieves)
VIDEO | रोड रोलरखाली कर्कश्श हॉर्न आणि सायलेन्सर चिरडले, लातूर पोलिसांचा धमाका https://t.co/bIClRTLdJT #Latur | #HonkingHorn | #Silencer
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021
संबंधित बातम्या :
डोंबिवलीच्या हिंमतवाल्या आजी, 80 वर्षांच्या वृद्धेचा हिसका, मंगळसूत्रचोराची धूम
जन्मदात्यांनी दर्ग्याजवळ सोडलं, पोलिसांनी ममत्व जपलं, पुण्यात चिमुरडीच्या पालकांचा शोध सुरु
Ulhasnagar | महिलेला कारची धडक, चालकाकडून चक्कर येऊन पडल्याचा बनाव, CCTV मुळे अपघाताचा खुलासा