विरारच्या शंभूनाथ मंदिरातील मूर्ती चोरट्यांनी पळवल्या, CCTVच्या आधारे 10 दिवसांतचं पोलिसांनी मुसक्या आवळल्या
शंभूनाथ मदिर चोरी प्रकरणाचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात छडा लावला आहे. (Virar Police)
पालघर: विरार पश्चिम येथील शंभूनाथ जैन मंदिरात रात्रीच्या वेळी चोरी करून, फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात विरार गुन्हे शाखा 03 च्या पथकाला यश आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या 10 दिवसात छडा लावला आहे. या प्रकरणात 4 चोरट्यांसह मूर्ती विकत घेणारे 2 जण असे 6 जणांना अटक करण्यात आलीय. आरोपींकडून 1 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चोरटे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर या गुन्ह्या व्यतिरिक्त विरार, अर्नाळा पोलीस ठाण्यात दुसरे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विरार पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. (Virar Police arrested six accused for Shambhunath temple theft)
50 वर्ष जून्या मूर्तींची चोरी
15 ते 16 डिसेंबर च्या मध्यरात्री विरार पश्चिम शंभूनाथ जैन मंदिरात चोरट्यांनी चोरी केली होती. 50 वर्षांपूर्वीच्या1 लाख 68 हजार रुपये किमंतीच्या मूर्ती चोरून चोरटे फरार झाले होते. या चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. या सीसीटीव्ही च्या आधारे विरार गुन्हे शाखा 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने पहिल्यांदा 4 चोरट्या च्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले होते. 4 आरोपींकडे कसून तपास केल्या नंतर चोरलेल्या मूर्ती विकत घेणार्या दोघांना पकडण्यात आले. या दोघांकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
आरोपींवर गंभीर गुन्हे
विकास सोमा पवार, विशाल जाधव, विल्सन एंजिनो, शेखर कोरी असे अटक चोरट्या चे नाव असून हे सर्व विरार चे राहणारे आहेत. तर नासिर युसूफ खान आणि निर्भय लालचंद सिंह असे चोरीचा माल विकत घेणाऱ्यांची नावं आहेत. पोलिसांनी या 6 ही जणांना बेड्या ठोकून पुढील तपास सुरू केला आहे
विरार पश्चिम येथे शंभुनाथ जैन मंदिर आहे. पन्नास वर्ष जून्या 12 मूर्त्या चोरीला गेल्या होत्या. ही घटना संवेदनशील असल्यामुळं गुन्हे प्रकटीकरण शाखेने कमी कालावधीत गुन्हा उघडकीस आणला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरुन 4 आरोपींना अटक करण्यात आली. ज्यांना मूर्त्या विकल्या त्या 2 आरोपींना अटक करण्यात आल्या. या आरोपींवर चोरी आणि दरोड्याचे गुन्हे नोंदवलेले आहेत, अशी माहिती विरारचे डीसीपी प्रशांत वाघुंडे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्या वादळाची तयारी’, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
नागपुरात थेट किचनमध्ये घुसून केटरर्सची निर्घृण हत्या, पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात
(Virar Police arrested six accused for shambhunath temple theft)