आमदाराच्या मुलासह वर्धा अपघातात दगावलेले इतर 6 जण कोण? सर्वांची ओळख पटली! नावंही समोर
Wardha Car Accident : या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. नीरज चौहान हा कार चालवत होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय.
वर्धा : वर्ध्यात (7 Medical Students Killed in Car Accident) मध्यरात्री झालेल्या अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांची ओळख अखेर पटली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आलं असून अपघाताची बातमी ऐकून सातही विद्यार्थ्यांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महिंद्रा एक्सयूव्ही (Mahindra XUV) कारनं बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या या सर्व मुलांची ओळख पहाटेपर्यंत होऊ शकली नव्हती. दरम्यान, आता अपघातातील सर्वच मुलांची ओळख पटली असून इतरांचीही नावं समोर आली आहेत. यात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं होतं. तिरड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडालेसह अन्य सहा जण या अपघातात दगावले असून यातील सर्व विद्यार्थी हे महाराष्ट्राबाहेरील असल्याचं कळतंय. सर्व मेडिकलचे विद्यार्थी असून ते एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. वेगवेगळ्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची कार नदीच्या पुलावरुन चाळीस फूट खोल दरीस कार कोसळून अपघात झाला होता.
अपघातातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं
आविष्कार रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1 प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2 शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2 पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1
अपघात कसा घडला?
देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान असल्याचं कळतंय. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली होती.
तब्बल चार तास बचावकार्य
या अपघातानंतर विद्यार्थ्यांचा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तब्बल चार तासांचा अवधी लागला. यानंतर पोस्टमॉर्टेमसाठी विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची ओळखही पटली असून आता विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनं अपघातातील सर्व मृत तरुणांच्या कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.
सगळ्यांची ओळख पटली
या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. नीरज चौहान हा कार चालवत होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान , आता सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली होती. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील सातही विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संपूर्ण मेडिकल कॉलेजही हादरुन गेलं आहे.
संबंधित बातम्या :
Photo | कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!