वर्धा : वर्ध्यात (Wardha crime news) एका 18 वर्षांच्या तरुणीनं फिनाईल प्राशन (Wardha Suicide News) केलं. या घटनेनंतर घरातले तरुणीला घेऊन रुग्णालयात गेले. पण तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने सगळेच हादरले. डॉक्टरांनी (Doctor) तपासणी केल्यानंतर ही तरुणी गरोदर असल्याचं समोर आलं. त्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. धक्का बसलेल्या कुटुंबीयांनी याबाबची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केलाय. आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या घटनेनं खळबळ माजलीय. प्रियकराला भेटायला का गेली होती, असे कुटुंबीय म्हणताच या युवतीने घरीच फिनाईल प्राशन केलं होतं. या घटनेनंतर कुटुंबियांनी तिला उपचारासाठी लगेचच रुग्णालयातही आणलं होतं. मुलीवर उपचार सुरु झाले आणि यात डॉक्टरांनी तरुणीची सोनोग्राफी केली. तेव्हा तपासणीदरम्यान, युवती चार महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात 18 वर्षीय मुलीचे तिच्या मामीच्याच मानलेल्या भावासोबत प्रेमसंबंध जुळले. यातूनच जानेवारी 2022 मध्ये पीडिता आर्वी तालुक्यातील एका गावात प्रियकराला भेटायला गेली. तेथे आरोपी युवकाने पीडितेशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. त्यानंतरही अनेकदा दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
9 जून रोजी रात्रीच्या सुमारास युवती ही परत युवकांच्या घरी गेली. मुलगी ही प्रियकराच्या घरी गेल्याची माहिती मिळताच मुलीच्या भावाने तिथे जाऊन तिला परत घरी आणलं. युवती घरी आल्यावर कुटुंबियांनी युवतीला उद्देशून ‘तू त्या युवकाला भेटायला का गेली होती’, असे म्हणत वाद घालत तिला मारहाण केली.
यातूनच रागाच्या भरात 10 जून रोजी सकाळच्या सुमारास घरातील बाथरुममध्ये तिने फिनाईल प्राशन केलं. घरच्यांना ही बाब समजताच घरच्यांनी तिला वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. डॉक्टरांनी उपचारदरम्यान तिच्या विविध तपासण्या केल्या. दरम्यान युवतीची सोनोग्राफी करताच पीडिता ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आलं. हे कळल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली.
दरम्यान आता कुटुंबीयांनी आर्वी पोलीस ठाण्यात आरोपी युवकाविरुद्ध कलम 376 (2) भादवी सहकलम 4, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आर्वी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.