फायरींग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वर्धा पोलिसांकडून अटक
वर्ध्यात गुन्हेगारांना शांत बसवण्यात पोलिसांना यश येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वर्ध्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
वर्धा – दोन देशी बनावटीच्या मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Wardha Police) दिली आहे. काही दिवसांपूर्वी वर्ध्यात दोन गटांत राडा होऊन फायरींग झाली होती . त्या घटनेतील फरार असलेला तसच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रितिक तोडसाम (Criminal Ritika Todsam) यांच्या शोधात पोलिसांचं एक फिरत होतं. खबऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रीतिक तोडसामकडून दोन देशी बनावटीच्या मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून (Local Crime Branch)करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाई झाल्यामुळे इतर सुध्दा त्याचा चांगलाचं दणका बसला आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं इतर कोणी कृत्य करणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय झालंय
पोलिसांनी आरोपीकडून दोन देशी बनावटीच्या मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. काही दिवसांपूर्वी वर्ध्यात दोन गटांत राडा होऊन फायरींग झाली होती. त्या घटनेतील फरार असलेला तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रितिक तोडसाम याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
वर्ध्यात गुन्हेगारांना शांत बसवण्यात पोलिसांना यश येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वर्ध्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन गटात ज्यावेळी राडा झाला, त्यावेळी रितिक तोडसाम या सराईत गुन्हेगाराने पिस्तुलमधून फायरिंग केली होती. त्यामुळं त्याला ताब्यात घेणं हे पोलिसांनीसाठी अगदी महत्त्वाचं काम होतं. सराईत गुन्हेगारावरती कारवाई झाल्यामुळे आता पुन्हा अशा पद्धतीचं कृत्य कोणी करणार नाही असं पोलिसांनी सांगितलं.